दोन वेळेच्या जेवणासाठी भारती सिंगला करावा लागला संघर्ष, मग बनली प्रसिद्ध कॉमेडियन

By गीतांजली | Published: November 21, 2020 03:21 PM2020-11-21T15:21:21+5:302020-11-21T15:37:48+5:30

एनसीबीने ड्रग्स प्रकरणात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगच्या घरी छापे टाकले.

Ncb searched house of comedian bharti singh know her struggle in life | दोन वेळेच्या जेवणासाठी भारती सिंगला करावा लागला संघर्ष, मग बनली प्रसिद्ध कॉमेडियन

दोन वेळेच्या जेवणासाठी भारती सिंगला करावा लागला संघर्ष, मग बनली प्रसिद्ध कॉमेडियन

googlenewsNext

एनसीबीने ड्रग्स प्रकरणात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगच्या घरी छापे टाकले. एनसीबीने भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोव्या इथल्या घरी  धाड टाकली. भारती सिंग आणि तिचा पती हर्ष  लिंबाचियाला समन्स पाठवला आहे. 

भारती सिंग छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. भारतीने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. भारतीचा पंजाब ते मुंबई हा प्रवास सोपा नव्हता. यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. 

भारतीने  दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते, मी केवळ दोन वर्षांची असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. मी लहानपणापासूनच खूप काम केले आहे. माझ्या आईने तर प्रचंड हालअपेष्ठा सहन केल्या आहेत. तिने आमच्यासाठी खूप काही केले आहे. आम्ही तीन भाऊ-बहीण असून तिने आम्हाला तिघांनाही खूप चांगले शिक्षण दिले. भारती सिंग पुढे म्हणाली, 'मी माझ्या कूपनमधून दिवसाला पाच रुपये वाचवायची आणि महिन्याच्या शेवटी घरी फळं आणि रस घेऊन जायचे. त्यावेळी दोन वेळेचे जेवायचे हाल होते. अशा परिस्थितीत  घरात फळ बघून आनंद व्हायचे. त्या काळात मी अमृतसरमध्ये थिएटर करायचे. 

मी कॉलेजमध्ये असताना मित्रमैत्रिणींसोबत मजा मस्ती करत होते. त्यावेळी सुदेश लहरी तिथून चालले होते. त्यांनी माझ्या शिक्षकांना जाऊन सांगितले की, या मस्ती करणाऱ्या मुलीला मला भेटायचे आहे. त्यांनी मला सांगितले की, कॉमेडी ड्रामामध्ये मी काम करावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी मला काही ओळी म्हणायला सांगितल्या आणि त्या मी त्या खूप चांगल्याप्रकारे सादर देखील केल्या. असे असले तरी कॉमेडी ड्रामाचा भाग व्हायला मी नकार दिला होता. पण माझ्या टीचरने मला सांगितले की, काहीही करून सुदेश यांना तू या कार्यक्रमात पाहिजे आहेस आणि यामुळे आमच्या कॉलेजचे देखील चांगले नाव होईल, एवढेच नव्हे तर तुझी फी माफ केली जाईल. हे सगळे ऐकल्यावर मी या कार्यक्रमासाठी होकार दिला आणि माझा अभिनयप्रवास सुरू झाला.

Web Title: Ncb searched house of comedian bharti singh know her struggle in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.