नीरा बॅनर्जीने करण खन्नाचे रुपांतर केले 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या 'ह्या' पात्रामध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 07:15 IST2019-04-11T07:15:00+5:302019-04-11T07:15:00+5:30
स्टार प्लसवरील 'दिव्य दृष्टी' ही मालिका प्रेक्षकांना आश्चर्याचे धक्के देत आहे.

नीरा बॅनर्जीने करण खन्नाचे रुपांतर केले 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या 'ह्या' पात्रामध्ये
आपल्या प्रत्येक भागात कथानकाला वेगळीच कलाटणी देऊन स्टार प्लसवरील 'दिव्य दृष्टी' ही मालिका प्रेक्षकांना आश्चर्याचे धक्के देत आहे. त्यामुळे पुढील भागात काय होणार, असा प्रश्न प्रेक्षकांना पडत राहतो. याशिवाय नीरा बॅनर्जी आणि करण खन्ना या प्रमुख भूमिकांमधील कलाकारांमधील पडद्यावरील आणि वास्तव जीवनातील सुंदर नात्यानेही प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे.
या मालिकेत करण आणि नीरा हे जरी पती-पत्नीची भूमिका रंगवीत असले, तरी ते एकमेकांना गेल्या आठ वर्षांपासून ओळखतात, ही गोष्ट फारशी कोणाला ठाऊक नसेल. या दोघांच्या अनेक आवडीनिवडी सारख्याच असून त्यात ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेची आवड हेही एक आहे. सध्या या मालिकेच्या नावाची चर्चा सुरू असल्याने नीराने करणला या मालिकेतील खाल ड्रोगोचे रूप चढविले.
नीरा सांगते, ''गेम ऑफ थ्रोन्स'मधील खाल ड्रोगोची भूमिका माझी सर्वात आवडती आहे. तो करणसारखाच अगदी पुरुषी, शक्तिमान आणि मर्द वाटतो. इतकेच नाही, तर करणची लांब दाढी आणि केसही खाल ड्रोगोसारखेच आहेत, त्यामुळे मी त्याला खालची वेशभूषा चढविली.'
नीराच्या या कल्पनाशक्तीमुळे चकित झालेल्या करणने सांगितले, ''गेम ऑफ थ्रोन्स'ची सध्या चलती असल्याने त्यातील खाल ड्रोगोची वेशभूषा करून नीराने मला चकित केलं. पण मला हे रूप नक्कीच आवडले.'