'भाभी जी घर पर हैं' मालिकेची अनिता भाभी बनणार नेहा पेंडसे, त्याआधीच हॉट पोल डान्सची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 14:04 IST2021-01-06T13:57:39+5:302021-01-06T14:04:38+5:30

गेल्या ५ वर्षांपासून सौम्या टंडन या मालिकेत काम करत होती. तिने अनिता भाभीची भूमिका लोकप्रिय केली होती. खाजगी कारणांमुळे काही दिवसांपूर्वीच सौम्याने ही मालिका सोडली होती.

Neha Pendse to be Anita Bhabhi of 'Bhabhi Ji Ghar Par Hain' series, Hot Pole Dance Viral | 'भाभी जी घर पर हैं' मालिकेची अनिता भाभी बनणार नेहा पेंडसे, त्याआधीच हॉट पोल डान्सची होतेय चर्चा

'भाभी जी घर पर हैं' मालिकेची अनिता भाभी बनणार नेहा पेंडसे, त्याआधीच हॉट पोल डान्सची होतेय चर्चा

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. 'मे आय कम इन मॅडम' या हिंदी मालिकेमुळे तर नेहा घराघरात पोहचली होती.आपल्या सहका-यांशी बिनधास्त फ्लर्ट करणारी बॉस रसिकांना चांगलीच भावली होती.  या मालिकेत नेहाने साकारलेली हॉट आणि सेक्सी बॉसची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. या मालिकेनंतर नेहा पेंडसे भाभाजी घर पर है मालिकेत सौम्या टंडनने साकारलेली अनिता भाभीच्या भूमिकेत झळकणार आहे. 

अभिनयाव्यतिरिक्त नेहा नवीन गोष्ट शिकण्यातही प्रचंड रस असतो. आवड म्हणूनच तिने पोल डान्सचे ट्रेनिग घेतले आहे. ट्रेनिंग दरम्यान नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोल डान्सची प्रॅक्टिस करतानाचे बरेच व्हिडिओ शेअर केले होते. ट्रेनिंग दरम्यान नेहाने तिच्या पोल डान्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.

या पोल डान्समधील नेहाची मादक अदा आणि सेक्सी फिगर यामुळे नेहाची बरीच चर्चा रंगली होती. पोल डान्स करताना नेहाचा बोल्ड लूक पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे तिने पोल डान्सच्या मदतीने आपले वाढलेले वजन कमी केले होते. 

गेल्या ५ वर्षांपासून सौम्या टंडन या मालिकेत काम करत होती. तिने अनिता भाभीची भूमिका लोकप्रिय केली होती. खाजगी कारणांमुळे काही दिवसांपूर्वीच सौम्याने ही मालिका सोडली होती. सौम्याने घेतलेल्या या निर्णयामुळे निर्मात्यांची झोप उडाली होती. त्यानंतर अनिता भाभीच्या भूमिकेसाठी अनेक नावांची चर्चा झाली. पण नेहाचे नाव कन्फर्म झाले.

 

सौम्याने शो सोडल्यानंतर निर्मात्यांनी प्रथम या भूमिकेसाठी नेहा पेंडसे यांच्याकडे संपर्क साधला. ती त्याची पहिली पसंती होती. त्यावेळी बर्‍याच गोष्टी अडकल्या होत्या. यानंतर मेकर्सनी बर्‍याच अभिनेत्रींकडे संपर्क साधला पण ही बाब तिथेही होऊ शकली नाही. चार महिन्यांनंतर निर्मात्यांनी नेहाशी संपर्क साधला आणि करार केला. नेहा लवकरच या शोच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

 

Web Title: Neha Pendse to be Anita Bhabhi of 'Bhabhi Ji Ghar Par Hain' series, Hot Pole Dance Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.