सिध्दीविनायक मालिकेच्या एका शॉटसाठी नेहा सक्सेनाने घेतले 12 तास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 05:46 AM2017-10-02T05:46:48+5:302017-10-02T11:16:48+5:30

एका हेट स्टोरीतून दोन व्यक्ती कशा एकत्र येऊ शकतात हे दाखवणारी मालिका सिध्दीविनायक रसिकांच्या भेटीला येणार आहेत.या मालिकेत नेहा ...

Neha Saxena took 12 hours for a shot from the Siddhivinayak series | सिध्दीविनायक मालिकेच्या एका शॉटसाठी नेहा सक्सेनाने घेतले 12 तास

सिध्दीविनायक मालिकेच्या एका शॉटसाठी नेहा सक्सेनाने घेतले 12 तास

googlenewsNext
ा हेट स्टोरीतून दोन व्यक्ती कशा एकत्र येऊ शकतात हे दाखवणारी मालिका सिध्दीविनायक रसिकांच्या भेटीला येणार आहेत.या मालिकेत नेहा सक्सेना  ही बॅकग्राऊंट डान्सरच्या भूमिकेत झळकणार आहे.तर अभिनेता नितीन गोस्वामी विनायक या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.नेहाची एक बॅकग्राऊंड डान्सरची भूमिका पाहाता.या मालिकेतील तिच्या पहिल्याच  सीनमध्ये तिचे नृत्यकोशल्य सिध्दी या भूमिकेच्या माध्यमातून पाहायला मिळणरा आहे.सिध्दीचे नृत्याबाबात असलेले प्रेम पडद्यावर दाखवणे हे नेहासाठी एक मोठे आव्हान होते.नेहालाही भूमिका पार पाडण्यासाठी ब-याच गोष्टी शिकाव्या लागल्या.विशेष म्हणजे एका इन्ट्रो सीनमध्ये या सिध्दीला नृत्यकलेविषयी असलेल प्रेम सिध्द करण्यासाठी  मालिकेच्या दिग्दर्शकाने तिच्याभोवती आगीचे रिंगण तयार केले.उत्साही नेहानेही हे आव्हान स्विकारत दिलेला सीन यशस्वीरित्या पूर्ण केला.दिलेला शॉटही अगदी तिने परफेक्ट दिला. फक्त तिला हा सीन करण्यासाठी तब्बल 12 तास लागल्याचे समजतंय.या पहिल्याच सीनबाबतबोलताना सक्सेना म्हणाली,फर्स्ट इंम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन ही म्हण सगळ्यांनाच माहिती आहे.हे लक्षात घेऊनच मी दिलेला टास्क पूर्ण केला.जरा वेळ जास्त लागला मात्र दिलेला टास्क पूर्ण केल्याचे समधान जास्त आहे.मी परफॉर्म करत असताना आगीच्या रिंगणला असलेला आगीचे चटके इतके भयानक होते की सेटवर सगळ्यांसाठीच ते 12 तास खूप जिकीरीचे गेले.इतकेच नव्हेतर मी परिधान केलेले चांदीचे दागिणे तापाला सुरूवात झाल्याने तो शॉट शूट करणे आणखीनच आव्हानात्मक झाला.दागिणे तापत असल्यामुळे ते थंड व्हावेत म्हणून अधून मधून ब्रेकही घ्यावा लागायचा.रात्रंदिवस घेतलेली मेहनतीमुळे एक वेगळंच समाधान आज मिळतंय.जे शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.आमची ही मालिका रसिकांनाही फुल ऑन मनोरंजनाची एक ट्रीट ठरेल अशी आशाव वाटत असल्याचे नेहाने सांगितले.

'साजन घर जाना है','तेरे लिये','अमिता का अमित','नच बलिये 7' मालिका आणि रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये नेहा झळकली आहे. तसेच नेहाने  टीव्ही अभिनेता शक्ती अरोडासह साखरपुडाही केला होता.मात्र काही कारणामुळे त्यांचे ब्रेक झाले.त्यामुळे लग्नबंधनात अडकणारे हे लव्हबर्डस लग्नाआधीच वेगळे झाले त्यावेळी या दोघांची जोडी टीव्ही कपलमध्ये सगळ्यात चर्चेत होती.

Web Title: Neha Saxena took 12 hours for a shot from the Siddhivinayak series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.