नेहाने केली यशची फजिती; 'माझी तुझी रेशीमगाठ'चा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 05:09 PM2022-03-02T17:09:31+5:302022-03-02T17:13:25+5:30

Mazi tuzi reshimgath: काही दिवसांपूर्वीच नेहाने यशसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या नात्याला एक नवं नाव मिळालं आहे. विशेष म्हणजे आता या दोघांनाही कायम एकमेकांना भेटीची ओढ लागली आहे.

Neha's humiliation of success; The video for 'My Silk Tie' is going viral | नेहाने केली यशची फजिती; 'माझी तुझी रेशीमगाठ'चा व्हिडीओ होतोय व्हायरल

नेहाने केली यशची फजिती; 'माझी तुझी रेशीमगाठ'चा व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे ही मालिका सुरु झाल्यापासून या दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यातच सध्या मालिकेत लव्ह ट्रॅक सुरु झाला आहे. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक होत आहे. 

काही दिवसांपूर्वीच नेहाने यशसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या नात्याला एक नवं नाव मिळालं आहे. विशेष म्हणजे आता या दोघांनाही कायम एकमेकांना भेटीची ओढ लागली आहे. इतकंच नाही तर नेहाला पाहिल्याशिवाय यशचा एकही दिवस चांगला जात नाही. अशातच नेहाने यशची चांगलीच फजिती केली आहे.

माझी तुझी रेशीमगाठ: यशच्या प्रेमात पडल्यानंतर बदलला नेहाचा लूक; फोटो आले समोर
 

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये खास नेहाला भेटण्यासाठी यश घरातून लवकर निघतो. इतकंच नाही तर तो चक्क समीरलाही नेहमीप्रमाणे सोबत घेऊन येत नाही. मात्र, या सगळ्यात नेहा यशची फजिती करते. ज्या नेहाला भेटण्यासाठी यश सकाळी सकाळी धावपळ करुन येतो. ती नेहा ऐनवेळी मी ऑफिसला येत नसल्याचं सांगते. त्यामुळे यशची चांगलीच चिडचिड होते. त्यामुळे आता नेहा भेटल्यावर यशची नेमकी प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

 

Web Title: Neha's humiliation of success; The video for 'My Silk Tie' is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.