भाभीजी आप तो कमाल है! नेहा पेंडसेचं मोहक सौंदर्य पाहून चाहते पडले प्रेमात....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 16:32 IST2021-02-17T16:28:08+5:302021-02-17T16:32:27+5:30
Nehha Pendse looks beautiful in viral pictures : मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात तिने अढळ स्थान मिळवले आहे.

भाभीजी आप तो कमाल है! नेहा पेंडसेचं मोहक सौंदर्य पाहून चाहते पडले प्रेमात....
अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे. 'बिग बॉस12' मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नेहा पेंडसे सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.
ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. नुकतेच तिने तिचे काही साडी आणि ड्रेसमधलं फोटो केले आहे. नेहाचे हे फोटो पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या फोटोवर फॅन्स जोरदार कमेंट्स आणि लाईक्स केले आहेत.
नेहा पेंडसे सध्या भाभीजी घर पर है मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारते आहे. आपल्या अदांनी तिने या भूमिकेला चार चांद लावले आहेत. नेहाने मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे.