श्रीदेवीच्या या भूमिकेमुळेच स्विकारली नेहा पेंडसेने मालिकेतील ही भूमिका?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 03:16 PM2016-12-28T15:16:29+5:302016-12-28T15:31:34+5:30
'हवाहवाई' म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या श्रीदेवीबरोबर एकदा तरी काम करायला मिळावे असे प्रत्येक कलाकराचे स्वप्न असते. असेच स्वप्न ...
' ;हवाहवाई' म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या श्रीदेवीबरोबर एकदा तरी काम करायला मिळावे असे प्रत्येक कलाकराचे स्वप्न असते. असेच स्वप्न लहानपणापासून उराशी बाळगले आहे अभिनेत्री नेहा पेंडसेने. नुकत्याच एका मुलाखतीत श्रीदेवीसह काम करण्याचे तिचे स्वप्न असल्याचे सांगितले. इतकेच नाहीतर 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेत जेव्हा एका बॉस - संजनाची भूमिका साकरायची संधी मिळाली तेव्हाही तिने श्रीदेवीला डोळ्यासमोर ठेवत ही भूमिका स्वीकारल्याचे सांगितले. बॉसची भूमिका साकारताना नेहासमोर श्रीदेवीच्या 'लाडला'
सिनेमातल्या घमेंडखोर बॉसचीच प्रतिमा उभी राहिली. त्यामुळेच नेहाने 'लाडला' सिनेमा तब्बल 50 वेळा बघितला असल्याचे सांगितले.
श्रीदेवीबरोबर पडद्यावर एकत्र काम करण्याचं स्वप्न मी कित्येक वर्षं मनात जोपासलं आहे. श्रीदेवी ही माझी सर्वात आवडती नायिका होती आणि पुढेही राहील. तिचं आकर्षण आणि अभिनयकौशल्य, तिच्या व्यक्तिमत्त्वाने माझ्यावर नेहमीच भुरळ घातली आहे.‘अॅक्शन’ उच्चारल्यानंतरची श्रीदेवी आणि ‘कट’ म्हटल्यानंतरची श्रीदेवी आगदी वेगळीअसते, असं मी अनेकदा ऐकलं आणि वाचलेही आहे. म्हणूनच आजही कलाकरांना श्रीदेवी प्रेरणादायी वाटतात. त्यामुळेच एकदा तरी श्रीदेवीबरोबर काम करायला मिळाले तर मी करत असलेल्या कामाचे सार्थक झाल्या सारखे समजेन. पाच वर्षांची असल्यापासून श्रीदेवीची मोठी फॅन अाहे अशा प्रकारे भरभरून श्रीदेवीबद्दल नेहाने सांगितले.लाईफ ओके वाहिनीवरील 'मे आय कम इन मॅडम' मालिके संदिप आनंद आणि नेहा पेंडसे मुख्य भूमिका साकारत आहेत. कॉमेडीचा बाज असलेल्या या मालिकेला अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळाली आहे.विशेष म्हणजे नेहा पेंडसेचा मालिकेतील ग्लॅमरस अंदाज रसिकांनाही भावतोय.