Video: निवेदिता सराफ यांच्या ऑनस्क्रीन सुनबाईंचा बोल्ड अंदाज; भरपावसात उतरली स्विमिंग पूलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 17:46 IST2023-07-19T17:40:42+5:302023-07-19T17:46:58+5:30
Jahnavi killekar: जान्हवीने हा व्हिडीओ शेअर करत स्वत:ला हॉट म्हटलं आहे.

Video: निवेदिता सराफ यांच्या ऑनस्क्रीन सुनबाईंचा बोल्ड अंदाज; भरपावसात उतरली स्विमिंग पूलमध्ये
सध्याच्या काळात मालिका वा सिनेमातील नायिकांसोबतच त्यातील खलनायिकादेखील लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. यात तुझ्यात जीव रंगला मधली नंदिता, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधली शालिनी किंवा ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील श्वेता यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या खलनायिकेच्या भूमिका गाजवल्या आहेत. परंतु, सध्या सोशल मीडियावर अशा एका अभिनेत्री चर्चा रंगलीये जी मालिका तर गाजवतीये पण त्याच बरोबर सोशल मीडियावरही तिच्या नावाचा बोलबाला आहे.
सध्या नेटकऱ्यांमध्ये 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतील सानियाची चर्चा रंगली आहे. ही भूमिका अभिनेत्री जान्हवी किल्लेदार साकारत असून ती सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. जान्हवीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये पोहत असून यावेळी ती कमालीची सुंदर दिसत आहे. तसंच तिने या व्हिडीओला दिलेलं कॅप्शनही चर्चेत आलं आहे.
अलिकडेच भाग्य दिले तू मला या मालिकेची संपूर्ण टीम लोणावळ्याला पावसाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. या पिकनिकमधील अनेक फोटो, व्हिडीओ जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्येच तिचा हा व्हिडीओ लक्षवेधी ठरत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवीने शॉर्ट ड्रेस घातल्याचं दिसून येत आहे. तसंच ती भरपावसात स्विमिंग पूलमध्ये उतरुन हा ऋतू एन्जॉय करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने हॉट असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, जान्हवीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. 'भर पावसाळ्यात वणवा पेटवला,' असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'कट्यार डायरेक्ट काळजात घुसली' , 'आजपर्यंत जान्हवीला एवढ्या हॉट अवतारात कधीही पाहिलं नव्हतं.' असं युजर्सने म्हटलं आहे.