बिग बॉस 14 वर बहिष्काराची मागणी; टास्क पाहून भडकले युजर्स, म्हणाले ‘वल्गर’
By रूपाली मुधोळकर | Published: October 8, 2020 11:04 AM2020-10-08T11:04:40+5:302020-10-08T11:08:09+5:30
सोशल मीडियावर ‘#BoycottBB14 ’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो आणि वादांचे जुने नाते आहे. अनेकदा हा शो वादात सापडला. म्हणूनच टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त म्हणून हा शो ओळखला जातो. ‘बिग बॉस’चा 14 सीझन सुरु होऊन आठवडा होत नाही तोच हा शो वादात सापडला असून आता या शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर ‘#BoycottBB14 ’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. आता असे का तर हा शोमधील एक टास्क.
‘बिग बॉस 14’ च्या अपकमिंग एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो एका टास्कचा आहे. यात बिग बॉस घरातील स्पर्धक मुलींना इम्युनिटी मिळवण्याची संधी देतात. पण यासाठी या मुलींना सिद्धार्थ शुक्लाला आपल्या अदांनी रिझवायचे आहे. प्रोमोत पवित्रा पुनिया, रूबीना दिलैक, जास्मिन भसीन, निक्की तंबोली बाईकवर बसलेल्या सिद्धार्थसोबत रेन डान्स करताना दिसतात. आपल्या मादक अदांनी रिझवताना दिसतात. आज गुरुवारी हा एपिसोड आॅन एअर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा प्रोमो आणि असे टास्क आक्षेपार्ह आणि अतिशय अश्लील असल्याचे अनेक लोकांखे मत आहे. त्यामुळे ट्विटरवर #BoycottBB14 हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.
#BoycottBB14 What the hell these things?What is happening in this BB 14?Shame on BB14.
— st@rAD⭐ (@ADstar08) October 7, 2020
Second idea is @sidharth_shukla Performing in this vulgar task
Sana kisi ko gale mile to ap ko problem hoti ha or ap Kya ker rahe h is rain dance task me Nikki ke sath task me esaksa junun h... pic.twitter.com/zrH23gj4BY
बिग बॉसला बॅन करण्याची वेळ आली आहे. गेल्या सीझनमध्ये हिंसेला प्रमोट केले होते आणि या सीझनमध्ये अश्लिलता पसरवली जातेय, असे एका युजरने लिहिले. ‘टास्कच्या नावावर अश्लिलला खपवली जाणार नाही. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आणखीही अनेक पर्याय आहेत. हा टास्क एंटरटेनिंग नाही तर चीप आहे,’असे अन्य एका युजरने लिहिले.
Using girls as prop and boys as a meal, telling them to seduce. the men are not a tool and the girls are not a prop. Showing this kind of vulgarity for the sake of task is not acceptable. It's a cringefest. #BoycottBB14
— katha 🌙 (@daffahojaosare) October 7, 2020
दुस-या एका युजरने बिग बॉसवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘दरवर्षी या शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी होते. पण कोणीच यावर बहिष्कार टाकत नाही. पण किमान कोणती दृश्य प्रेक्षकांना भडकवू शकतात, याचे तर भान हवे, ’ असे या युजरने लिहिले आहे.
#BoyCottBB14
— ✨ (@ksharika11) October 7, 2020
Shame on you @ColorsTV thinking that audience is cheap , playing with emmotions and objectifying women.
Using girls as prop and boys as a meal, telling them to seduce. the men are not a tool and the girls are not a prop. Showing this kind of vulgarity for the sake of task is not acceptable. It's a cringefest. #BoycottBB14
— katha 🌙 (@daffahojaosare) October 7, 2020
बिग बॉस 13 वरही झाली होती बहिष्काराची मागणी
बिग बॉसचा 13 वा सीझनही अगदी पहिल्याच आठवड्यात वादात सापडला होता. या सीझनमधील बीएफएफ ही संकल्पना लोकांना आवडली नव्हती. घरात एन्ट्री करण्याच्या आगोदरच सदस्यांचा बीएफएफ म्हणजे (बेड फ्रेन्ड फोरेव्हर) कोण असेल हे ठरवलेहोते. बीएफएफच्या संकल्पनेनुसार एकाच बेडवर दोन सदस्यांना झोपायचे होते. घरातील काही महिला सदस्यांनी पुरुष सदस्यांसोबत बेड शेअर करायचा होता आणि प्रेक्षकांना नेमकेहेच खटकले होते अनेकांनी बिग बॉसच्या संकल्पनेचा कडाडून विरोध केला होता. काहींनी बिग बॉस लव्ह जिहादला खतपाणी घालत असल्याचाही आरोप केला होता.
‘बिग बॉस 14’मध्ये होणार ‘सपना भाभी’ची वाईल्ड कार्ड एन्ट्री? जाणून घ्या कोण आहे सपना सप्पू
Bigg Boss 14 : पवित्रा पुनियाने माझ्यापासून लपवली लग्नाची गोष्ट...! एक्स-बॉयफ्रेन्डचा दावा
Bigg Boss 14: निक्की तू मत बोल वरना...! बिग बॉसच्या घरात ‘हिला’ पाहून चाहत्यांना आठवली राखी सावंत