'बिग बॉस'च्या घरात एल्विश यादवला कॉपी करतोय लवकेश कटारिया ? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 11:16 AM2024-06-24T11:16:15+5:302024-06-24T11:17:25+5:30

लवकेश कटारिया हा YouTuber आहे आणि बिग बॉस OTT सीझन 2 चा विजेता एल्विश यादवचा खास मित्र देखील आहे.

Netizens trolled Lovekesh Kataria copying Elvis Yadav in 'Bigg Boss' house | 'बिग बॉस'च्या घरात एल्विश यादवला कॉपी करतोय लवकेश कटारिया ? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'बिग बॉस'च्या घरात एल्विश यादवला कॉपी करतोय लवकेश कटारिया ? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

बिग बॉस ओटीटीचं  (Bigg boss OTT 3) तिसरं पर्व नुकतंच सुरु झालं आहे. या नव्या पर्वात सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सपासून बॉलिवूडसेलिब्रिटींपर्यंत चर्चेत राहिलेल्या अनेकांनी सहभाग घेतला आहे. यामध्येच शोमध्ये सहभागी झालेल्या १६ स्पर्धकांपैकी लवकेश कटारियाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. पण, लवकेशला ट्रोल केलं जातं आहे. 


लवकेश कटारिया हा YouTuber आहे आणि बिग बॉस OTT सीझन 2 चा विजेता एल्विश यादवचा खास मित्र देखील आहे. आता त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्पर्धकांना 'शेर बंदरिया'शी संबंधित एक गोष्ट सांगताना दिसतोय. जेव्हा एल्विश हा बिग बॉसच्या घरात होता, तेव्हा त्यानेही हीच गोष्ट स्पर्धकांना सांगितली होती. त्यामुळे लवकेश हा एल्विशची कॉपी करत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, Bigg boss OTT 3 हा कार्यक्रम २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या पर्वात चर्चेत राहिलेले अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्युएर्न्सनी सहभाग घेतला आहे. यात लवकेशसह अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी तसंच दिल्लीची वडापाव गर्ल ये सोशल मीडिया स्टारही चर्चेत आहेत. तर यंदा होस्ट अभिनेता अनिल कपूर आहे. 

Web Title: Netizens trolled Lovekesh Kataria copying Elvis Yadav in 'Bigg Boss' house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.