किती वेड्यात काढायचं? ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 12:06 PM2023-09-01T12:06:57+5:302023-09-01T12:09:41+5:30
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिका आता महत्त्वाच्या आणि तितक्याच रोमांचक वळणावर आली आहे. ...
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिका आता महत्त्वाच्या आणि तितक्याच रोमांचक वळणावर आली आहे. मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !', असे या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे. यावर मालितकेत दाखवण्यात आलेल्या बऱ्याच गोष्टी न पटण्यासाख्या असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी जयदीपला एका खड्ड्यात पुरताना म्हणते की, ‘या टाइमाला नशीबानं मला साथ दिली गौरी. जयदीप 'भावपूर्ण श्रद्धांजली तुला'. तर दुसरीकडं गौरी जयदीपच्या शोधात असते. यावेळी तिला गणपती बाप्पाची पालखी दिसते आणि बाप्पाला प्रार्थना करत जयदीपला माझ्यापासून कुठेही घेऊन जाऊ नकोस..असं ती म्हणताना दिसते. एवढ्यात पाय अडखळून ती पडते आणि गळ्यातलं मंगळसूत्रही पडतं. यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग. उंदीर मामा तुचं गौरीला आता मार्ग दाखवं बरं.'. तेवढ्यात एक उंदीर येतो. पण, चाहत्यांना मात्र या प्रोमोतील ही गोष्ट चांगलीच खटकली आहे.
या व्हिडिओ नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहे. तर असे किती वेड्यात काढायचं? असंही एका युझरनं म्हटलं आहे. तर एकाने 'दु:ख म्हणजे हेच असतं हे कळालं प्रेक्षकांना. आता निरोप घ्या आणि प्रेक्षकांना सुखी करा, असे म्हटलं आहे.
'सुख म्हणजे काय असतं' ही एक मराठी मालिका असून स्टार प्रवाह दूरचित्रवाणी वाहिनीवर १७ ऑगस्ट २०२० पासून प्रसारित होत आहे. गिरीजा प्रभू , मंदार जाधव, वर्षा उसगांवकर, माधवी निमकर यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे. मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना आवडतायत. पण मालिकेच कथानक पटत नसल्यातं त्यांचं म्हणणं आहे.