“महाराजांची भूमिका कधीही साकारू नकोस”, अमोल कोल्हेंना दिलेला सल्ला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 05:21 PM2023-07-17T17:21:03+5:302023-07-17T17:22:46+5:30
जेव्हा दिग्गज रंगकर्मींनी अमोल कोल्हेंना दिलेला महाराजांची भूमिका न साकारण्याचा सल्ला, अभिनेता खुलासा करत म्हणाला...
‘खुपते तिथे गुप्ते’ हा लोकप्रिय शो सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या दोन पर्वांप्रमाणेच हा सीझनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोमध्ये कलाकारांसह राजकीय नेतेही सहभागी झालेले पाहायला मिळतात. अवधूत त्यांना अनेक खुपणारे प्रश्न विचारुन बोलतं करत असतो.
अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमच्या नवीन भागात अभिनेता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे सहभागी होणार आहे. या नवीन भागाचे काही प्रोमो व्हिडिओ समोर आले आहेत. विविधांगी भूमिका साकारुन अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अमोल कोल्हेंनी मालिका व चित्रपटांत साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. परंतु, महाराजांची भूमिका कधीही साकारू नकोस, असा सल्ला त्यांना देण्यात आला होता. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर अमोल कोल्हेंनी या गोष्टीचा खुलासा केला आहे.
“गावात थिएटर नसल्याने बायका बैलगाडीतून...”, ‘बाईपण भारी देवा’ फेम शिल्पाने सांगितला अनुभव
“यशवंतरावर चव्हाण नाट्यगृहाच्या बाहेर एका दिग्गज रंगकर्मींनी मला महाराजांची भूमिका कधीच करू नकोस, ती फळत नाही, असं सांगितलं होतं. जेव्हा मी महाराजांची भूमिका साकारली, तेव्हा मी जेमतेम २८ वर्षांचा होतो. २८व्या वर्षीच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून दख्खनच्या पठारावर स्वत:ची द्वाही फिरवली. आपल्याला २८व्या वर्षी संधी मिळतेय. ही संधी घ्यायला काय हरकत आहे,” असं अमोल कोल्हे म्हणाले.
“ते वन नाइट स्टँड...”, ऋषी कपूर यांच्या लग्नानंतरच्या अफेअर्सबाबत नीतू कपूर यांनी केलेला खुलासा
अमोल कोल्हेंनी मालिका तसेच चित्रपटांतही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतही ते दिसले होते. या दोन्ही भूमिकांमध्ये त्यांना चाहत्यांनी पसंत केलं. ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये अमोल कोल्हेंआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संजय राऊत यांनीही हजेरी लावली होती.