'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत नव्या देवकीची झाली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 02:35 PM2022-05-16T14:35:46+5:302022-05-16T14:36:17+5:30

Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील देवकीच्या भूमिकेत दिसणाऱ्या मीनाक्षी राठोडने नुकताच मुलीला जन्म दिला. तिच्याजागी आता नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

New Devki enter in Sukh Mhanje Nakki Kay Asata Serial | 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत नव्या देवकीची झाली एन्ट्री

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत नव्या देवकीची झाली एन्ट्री

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. शालिनीचे डावपेच एकीकडे सुरु असताना गौरीदेखील खंबीरपणे या डावपेचांचा सामना करते आहे. शालिनीच्या प्रत्येक षडयंत्रामध्ये तिची साथ देणारी सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे देवकी. देवकीशिवाय शालिनी अपूर्ण आहे. देवकीची भूमिका आधी अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) साकारत होती. मात्र मीनाक्षीने खऱ्या आयुष्यात बाळाला जन्म दिल्यामुळे ती प्रसुती रजेवर आहे. त्यामुळे आता तिच्याजागी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी (Bhakti Ratnaparkhi) दिसणार आहे. आजपासून भक्ती रत्नपारखी देवकीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत पाहायला मिळत आहे की, घरात सगळे हॉलमध्ये बसलेले आहेत आणि शालिनी फोनवर बोलताना दिसते आहे. तितक्यात जाऊ बाई असे देवकी आवाज देते. तिला पाहून शालिनी खूप खूश होते आणि माझी देवकी आली म्हणत तिच्याकडे जाते. नवीन देवकीची मालिकेत एन्ट्री झाली असली तरी चाहते मीनाक्षी राठोडला मिस करताना दिसत आहे. 

भक्ती रत्नपारखी देवकी हे पात्र साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे. या मालिकेत्या एण्ट्रीविषयी ती म्हणाली होती की, ‘देवकी हे अतिशय लोकप्रिय पात्र मला साकारायला मिळत आहे, याचा मला आनंद आहे. पण जबाबदारीही वाढली आहे. कारण मीनाक्षीने देवकी हे पात्र अतिशय उत्तमरित्या निभावले आहे. माझ्यासाठी देवकी साकारणे चॅलेजिंग असेल. सेटवर आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे आणि सर्वच सहकलाकारांची मला साथ मिळते आहे. 

Web Title: New Devki enter in Sukh Mhanje Nakki Kay Asata Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.