रुप-मर्द का नया स्वरुप या मालिकेत यश टोंक साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 05:29 AM2018-05-17T05:29:50+5:302018-05-17T10:59:50+5:30

कणखर, बलवान, मर्दानीपणा असणारा आदर्श पुरूष असतो. स्वतःच्या कमतरता कधीही न दाखविणारा, कधीही अश्रू न ढाळणारा पुरूष हा खरा ...

A new form of man-of-the-art, the role of realizing success in the series | रुप-मर्द का नया स्वरुप या मालिकेत यश टोंक साकारणार ही भूमिका

रुप-मर्द का नया स्वरुप या मालिकेत यश टोंक साकारणार ही भूमिका

googlenewsNext
खर, बलवान, मर्दानीपणा असणारा आदर्श पुरूष असतो. स्वतःच्या कमतरता कधीही न दाखविणारा, कधीही अश्रू न ढाळणारा पुरूष हा खरा पुरूष समजला जातो. पण या सर्व साचेबंद कल्पना मोडून टाकण्याचे लक्ष ठेवणाऱ्या कलर्सने प्रेक्षकांना एका नव्या शोची भेट दिली आहे, रुप-एक नया स्वरुप मधून. रुप (अफान खान) नावाचा आठ वर्षांचा एक मुलगा पुरूष आणि स्त्रिया यांनी कसे वागावे हे ठरवणाऱ्या पितृप्रधान समाजाला प्रश्न विचारत आहे. रश्मी शर्मा टेलिफिल्मस लि. द्वारे निर्मित रुप जुन्या साचेबंद प्रकारांमध्ये बदल घडवून आणेल अशी आशा आहे. ही मालिका २८ मे २०१८ पासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता कलर्स वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत यश टोंक मुख्य भूमिका साकारत आहे. आपल्या भूमिकेविषयी यश सांगतो, "रुप-मर्द का नया स्वरुप या मालिकेची संकल्पना अतिशय वेगळी आहे आणि माझे पात्र एक पुरूष असल्याच्या सर्व वैशिष्ट्यां विषयी आपल्याला विचार करायला लावते. मर्दानीपणाचा अभिमान असलेला एक दरोगा शमशेर सिंह कोणालाही उत्तर देत नाही आणि पुरूषीपणाचे चिन्ह म्हणून ताकतीचे प्रदर्शन करतो. पण, मी या देशातील सर्व पुरूषांना विनंती करतो की स्त्रियांना सुद्धा पुरूषांसारख्याच भावना आणि महत्वाकांक्षा असतात हे जाणून घ्या आणि आम्ही त्या सुद्धा समाजाचा एक समान हिस्सा आहेत हे कबूल केले पाहिजे. मला असे वाटते की, कलर्स आणि रश्मी शर्मा यांनी मनात खोलवर रुजलेल्या समाजावर विचार करण्यासाठी प्रेक्षकांना प्रवृत्त केले आहे. मला आता या शो मध्ये काम करण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. रुपच्या आईची कमलाची भूमिका साकारणाऱ्या मिताली नाग सांगतात, “समाज पुरूष आणि स्त्रियांची वर्तणूक ठरवत असताना रुप ही परंपरागत बंधने तोडून टाकतो. कमला ही इतर आई आणि पत्नी सारखीच आहे, जी तिच्या मुलांप्रती जास्त संरक्षक आहे आणि त्यांच्या वडिलांच्या रागापासून त्यांना वाचविण्यासाठी काहीही करायला तयार असते. विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या शो मध्ये मला सहभागी केल्याबद्दल मी या चॅनेलची आणि निर्मात्यांची आभारी आहे.”

Also Read : गौरी टोंकने शेअर केला मुलीचा फोटो

Web Title: A new form of man-of-the-art, the role of realizing success in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.