नवं कोरं धम्माल विनोदी नाटक “आलाय मोठा शहाणा”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2016 12:08 PM2016-05-08T12:08:22+5:302016-05-08T17:38:22+5:30

‘लग्नलॉंजी’, ‘स्पिरीट’, ‘अबीर गुलाल’ हया यशस्वी नाटकानंतर निर्माते अशोक दगडू शिगवण तृप्ती प्रॉडक्शनच्या बॅनरखाली “आलाय मोठा शहाणा” हे धमाल विनोदी नाटक घेऊन येत आहेत. संतोष पवार दिग्दर्शित व वैभव अर्जुन परब लिखित हया नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग१५ ...

New Korh Dhammal humorous drama "There is a big wise" | नवं कोरं धम्माल विनोदी नाटक “आलाय मोठा शहाणा”

नवं कोरं धम्माल विनोदी नाटक “आलाय मोठा शहाणा”

googlenewsNext
ग्नलॉंजी’, ‘स्पिरीट’, ‘अबीर गुलाल’ हया यशस्वी नाटकानंतर निर्माते अशोक दगडू शिगवण तृप्ती प्रॉडक्शनच्या बॅनरखाली “आलाय मोठा शहाणा” हे धमाल विनोदी नाटक घेऊन येत आहेत. संतोष पवार दिग्दर्शित व वैभव अर्जुन परब लिखित हया नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग१५ मे रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे होत आहे. संतोष पवारांचं नाटक म्हणजे धमाल मनोरंजन असणार हे ओघाने आलंच.आतापर्यंत ४० हून अधिक नाटकं सादर केलेला व गेली अनेक वर्ष नाट्य व चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन व अभिनयाच्याजोरावर घराघरात पोहोचलेला संतोष पवार यांचं “आलाय मोठा शहाणा” हे नाटक म्हणजे विनोदाचा खजिना आहे.
 “आलाय मोठा शहाणा” हया नाटकात ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ हा आजचा ध्येयमंत्र अधोरेखित केला आहे. यातील नायिका ९ वी पर्यंत शिकली आहे पण दहावी पास होणं तीच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे तीचं लग्न होत नाही. लग्नासाठी तीला दहावी पास होणं गरजेचं आहे. त्यासाठी तीला खासगी शिकवणी ठेवली जाते व त्यातून जी धम्माल मस्ती उडते त्याचं रंजक सादरीकरण हया नाटकातदिग्दर्शक संतोष पवार यांनी आपल्या स्टाइलने केले आहे. नाटकाची कथा अतिशय धम्माल विनोदी गमतीशीर आहे. त्यामुळे सर्वच वयोगटातील प्रेक्षकांचं हे नाटक उत्तम मनोरंजन करील असा निर्माते – दिग्दर्शकांना विश्वास आहे.
 ‘कॉमेडी एक्सप्रेस’ विनोदी मालिका तसेच ‘खळखट्याक’, ‘एका लग्नानंतरचे घोस्ट’ ‘सतराशे साठ सासूबाई’ हया नाटकातून व अनेकचित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जाणारा प्रतिभावंत अष्टपैलू अभिनेता आशिष पवार हया नाटकात मास्तराच्या भूमिकेत आहे.‘जाणून बुजून’ हया नाटकानंतर संतोष पवार व आशिष पवार हे जवळ जवळ १३ वर्षानी एकत्र येत आहेत. त्याचबरोबर विनोदवीर आनंदा कारेकर, महेश कोकाटे, नितिन जाधव, ओमकार पनवेलकर, मनिषा चव्हाण, विनोद दाभिळकर हे लोकप्रिय कलाकार या नाटकात इतर भूमिकेत आहेत. तसेच ‘आराधना’, ‘आभास हा’, ‘तू जीवाला गुंतवावे’ हया मालिकेतील व ‘भाकरखडी’ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्रीअपुर्वा नेमळेकर देशपांडे ही हया नाटकात काम करीत असून हया नाटकाद्वारे ती रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. या नाटकाचे संगीतअमीर हडकर यांचे असून नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना शितल तळपदे, नृत्य संपदा जोगळेकर, गीते राजेश देशपांडे यांची असूनसुत्रधार गोट्या सावंत हे आहेत. चांगली संहिता, उत्तम अभिनेते, नेत्रसुखद नेपथ्य, संगीत आणि दिग्दर्शन हया सर्व बाजूंनी परिपूर्ण असंहे नवीन धम्माल विनोदी नाटक “आलाय मोठा शहाणा” प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास येत आहे.
 

Web Title: New Korh Dhammal humorous drama "There is a big wise"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.