'संभाजी' फेम या अभिनेत्रीने केलं नवं फोटोशूट, मराठमोळ्या साजमध्ये दिसतेय खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 16:40 IST2019-12-30T16:39:53+5:302019-12-30T16:40:42+5:30

संभाजी मालिकेतून या अभिनेत्रीने गाजविले रसिकांच्या मनावर अधिराज्य

New photoshoot done by 'Sambhaji' fame actress Ashwini Mahangade, looks very beautiful in Marathmolai Saaj | 'संभाजी' फेम या अभिनेत्रीने केलं नवं फोटोशूट, मराठमोळ्या साजमध्ये दिसतेय खूप सुंदर

'संभाजी' फेम या अभिनेत्रीने केलं नवं फोटोशूट, मराठमोळ्या साजमध्ये दिसतेय खूप सुंदर

 
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यानंतर सध्या ती झी मराठी वाहिनी वरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणुबाईच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. 

अश्विनी महांगडे सोशल मीडियावर सक्रीय असून ती नेहमी फोटो व व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकताच तिने एक पाठमोरा फोटो शेअर केला आहे. या फोटोला खूप लाईक्स मिळत आहेत. या फोटोची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसते आहे. आता म्हणाल या फोटोत आहे तरी काय? तर फोटो जरी पाठमोरा असला तरी गुलाबी हिरव्या रंगाची साडी आणि त्या गेटअपवर केलेली वेणीची हेअरस्टाईल खूप छान वाटते आहे. त्यात केसांना केलेले हायलाईट्स आणि वेणीत फुलांचा वापर करून हेअर स्टाईल खूपच छान झाली आहे. 


अश्विनीचा हा सुंदर फोटो अंकुश सर्वसाने व श्रीनिवास गज्जलवार यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. तर मेकअप ऐश्वर्या शेलार व ड्रेस डिझाईन तनुजा पवारने केला आहे.


अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.


याबाबत अश्विनी म्हणाली होती की, मी आणखीन एका चित्रपटात काम करताना दिसणार आहे. खरंतर एखादी भूमिका कलाकाराला खूप काही देऊन जाते. राणूअक्का भूमिकेमुळे माझ्यासमोर अनेक दालनं खुली केली आहेत. या भूमिकेमुळे मला प्रेक्षकांचं व चाहत्यांचं खूप प्रेम मिळत आहे. कलाकारांचं प्रेम पुढील प्रवासासाठी प्रोत्साहन देणारे असते. यात बळावर मी माझा पुढील प्रवास सुरू ठेवला आहे.


अभिनयाशिवाय सामाजिक भान जपत अश्विनीने 'स्वराज्य परिपूर्ण किचन' हे हॉटेल मिरा रोड येथे सुरु केले आहे. या हॉटेलमध्ये फक्त ४० रुपयांना थाळी मिळते. या स्वराज्य थाळीमध्ये दोन चपात्या, दोन प्रकारच्या भाज्या, वरण-भात, पापड, कोशिंबीर, एक गोड पदार्थ आणि ताक अशा स्वादिष्ट मेनूचा समावेश आहे.

Web Title: New photoshoot done by 'Sambhaji' fame actress Ashwini Mahangade, looks very beautiful in Marathmolai Saaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.