New Marathi Serial : झी मराठीवर सुरू होतेय आणखी एक नवी मालिका, समोर आला पहिला प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 04:00 PM2022-08-31T16:00:02+5:302022-08-31T16:02:31+5:30

New Marathi Serial Promo : होय, झी मराठीवर लवकरच एक नवीकोरी मालिका सुरू होतेय आणि याचा प्रोमो रिलीज झाला आहे.

new serial Dar Ughad Baye Coming soon on zee marathi starting from 19 september | New Marathi Serial : झी मराठीवर सुरू होतेय आणखी एक नवी मालिका, समोर आला पहिला प्रोमो

New Marathi Serial : झी मराठीवर सुरू होतेय आणखी एक नवी मालिका, समोर आला पहिला प्रोमो

googlenewsNext

गेल्या काही महिन्यात झी मराठी  (Zee Marathi)या वाहिनीवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्यात. अर्थात टीआरपीच्या रेसमध्ये टिकायचं तर हे गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांत तू चाल पुढं. अप्पी आमची कलेक्टर अशा नव्या मालिका सुरू झाल्या. लवकरच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीय येतेय. इतकंच नाही, आता आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. होय, झी मराठीवर लवकरच एक नवीकोरी मालिका सुरू होतेय आणि याचा प्रोमो रिलीज झाला आहे. ‘दार उघड बये’ असं या मालिकेचं नाव आहे. विशेष म्हणजे ‘दार उघड बये’ (Dar Ughad Baye) ही  मालिका झी बांग्ला वरील ‘जमुना धाकी’ या मालिकेचा रिमेक असल्याचं कळतंय.

येत्या 19 सप्टेंबरपासून ही नवी मालिका सुरू होतेय. या मालिकेमध्ये शरद पोंक्षे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. शरद पोंक्षे सध्या स्टार प्रवाहावरी ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहेत. ‘दार उघड बये’ ही नवी मालिका मिळाल्याने ते ‘ठिपक्यांची रांगोळी’  या मालिकेला रामराम ठोकणार का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

माझी तुझी रेशीमगाठ घेतेय निरोप
नवी मालिका येणार म्हणजे, जुनी मालिका संपणार. तर लवकरच झी मराठीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. येत्या 18 सप्टेंबरला ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा अखेरचा एपिसोड प्रसारित होणार आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या जागेवर ‘दार उघड बये’ ही मालिका सुरू होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: new serial Dar Ughad Baye Coming soon on zee marathi starting from 19 september

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.