'राजा रानीची गं जोडी'मध्ये येणार मोठं वादळ, संजीवनी करणार रणजीतला अटक ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 13:28 IST2021-07-14T13:28:16+5:302021-07-14T13:28:42+5:30
दादासाहेंबांनी संजीवनी – रणजीतविरुध्द रचलेल्या नव्या कटामुळे त्यांच्यासमोर एक नवीन संकट येऊन उभे राहीले आहे.

'राजा रानीची गं जोडी'मध्ये येणार मोठं वादळ, संजीवनी करणार रणजीतला अटक ?
राजा रानीची गं जोडी मालिकेत संजीवनीच्या आयुष्यातील संकट काही कमी होण्याचे काही चिन्हे दिसत नाहीत. आता इतक्या महिन्यानंतर कुठे दोघांच्या वाट्याला सुखाचे, आनंदाचे क्षण येऊ लागले होते, मात्र तेदेखील त्यांच्या नशिबी नाही की काय असे वाटू लागले आहे. दादासाहेंबांनी संजीवनी – रणजीतविरुध्द रचलेल्या नव्या कटामुळे त्यांच्यासमोर एक नवीन संकट येऊन उभे राहीले आहे. यामुळे दोघाच्या संसारात कुठले मोठे वादळ येणार आहे हे प्रेक्षकांना या आठवड्यात समजणार आहे.
संजीवनी रणजीतला अटक करण्यासाठी घरी येणार आहे, तिच्यासाठी हे आयुष्यातील सगळ्यात मोठे आव्हान असणार यात शंका नाही. पण ते म्हणतात ना, जेव्हा नाती घट्ट होऊ पहातात तेव्हाच त्यांची कसोटी लागते हे अगदी खरे आहे.
PSI संजीवनी की ढालेपाटील यांची सून, रणजीतची बायको संजीवनी यामध्ये संजीवनीची मोठी कसोटी लागणार आहे. पण आयुष्यातील या मोठ्या संकटालादेखील राजाच्या साथीने राणी कशी मात देईल ? संजीवनी आणि रणजीत या संकटाला कसे सामोरे जातील ?. दादासाहेब, राजश्री वाहिनी आणि अपर्णा यांनी रचलेल्या कटामध्ये रणजीत आता पुर्णपणे अडकला असून त्याच्या नावाचे अरेस्ट वॉरण्ट निघते आणि त्याला अटक करण्याची जबाबदारी संजीवनीवर सोपण्यात येते.
आता हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे की, संजीवनी रणजीतला अटक करणार ? पुढ काय घडणार ? जाणून घेण्यासाठी १६ आणि १७ जुलैचा राजा रानीची गं जोडी मालिकेचा विशेष भाग पहावा लागेल.