'गुलमोहर' मालिकेत पाहायला मिळणार नवीन कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 09:53 AM2018-04-21T09:53:39+5:302018-04-21T15:23:39+5:30

'गुलमोहर' या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात.प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदीच ...

New story will be seen in 'Gulmohar' series | 'गुलमोहर' मालिकेत पाहायला मिळणार नवीन कथा

'गुलमोहर' मालिकेत पाहायला मिळणार नवीन कथा

googlenewsNext
'
;गुलमोहर' या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात.प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे.प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर.या मालिकेने आता पर्यंत त्यातील अप्रतिम गोष्टींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.यावेळी गुलमोहर एका आईची व्यथा आगामी 'आईची सुट्टी'या कथेद्वारे सज्ज झाली आहे.कुटुंबासाठी घड्याळाच्या काट्यावर काम करणाऱ्या आईसाठी सुट्टी किती महत्वाची असते हे या कथेत मांडण्यात आले आहे.या कथेत किशोर चौगुले दिवाकरची तर श्रुजा प्रभुदेसाई दिवाकरची बायको सरलाची भूमिका साकारत आहेत.बायको,आई, गृहिणी म्हटलं की प्रत्येक नवऱ्याच्या समोर एकच प्रतिमा उभी राहते ते म्हणजे घरातली कामं जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडणारी हक्काची व्यक्ती. मात्र तिला देखील कधीतरी वाटतं सुट्टी काढून नेहमीपेक्षा वेगळ आयुष्य जगावं, कधीतरी मुलांसोबत नवऱ्या सोबत चार क्षण सुखाचे आरामाचे घालवावेत.पण नवरा थोडा अरसिक असेल तर,अशा वेळी इच्छा असून पण मन मारून जगणाऱ्या स्त्रीची काय अवस्था होत असेल? अशीच अवस्था कथेतील सरलाची आहे.तिला देखील खूप वाटत दुसऱ्याप्रमाणे आपण देखील फॅमिलीसोबत सुट्टीवर जावं पण अरसिक नवरा असल्यामुळे तिची ही इच्छा कधीच पूर्ण झाली नाही.तिने कधीही कुठे जायचे ठरवले तरी काहीना काही कारण काढून दिवाकर तो विषय टाळत असे.अशी काहीशी कथा मालिकेत रंगणार आहे.


रोल..कॅमेरा..अ‍ॅक्शन.. त्यांच्या या तीन शब्दांच्या हुकमावरून सेटवरची सर्व सूत्रे हलण्यास सुरुवात होते. एखाद्या जहाजाची दिशा त्याचा कप्तान ठरवितो, त्याप्रमाणे दिग्दर्शक हा मालिका तसेच चित्रपटाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलत असतो. दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून मालिका आकार घेत असते. पण जेव्हा हाच दिग्दर्शक मुख्य अभिनेता होतो तेव्हा ? आहे ना गमंत झी युवावर सोमवार आणि मंगळवार रात्री ९:३० वाजता प्रदर्शित होणारी गुलमोहर ही सिरीज खरंतर प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळीं हेच दिग्दर्शित करतात  पण या सोमवारची कथा थोडी हटके होती आणि त्या गोष्टीला न्याय देणारा एक चांगला अभिनेता हवा होता. जेव्हा त्यांनी ही कथा त्यांच्या युनिट ला ऐकवली तेव्हा सगळ्यांनाच मंदार देवस्थळींनी ही भूमिका करावी असे सुचवले.भूमिकेला मंदार देवस्थळी योग्य निवड आहे असे वाहिनीने सुद्धा सुचवले.मग काय दिग्दर्शकाची धुरा फ्रेशर्स फेम दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे कडे सोपवत एका अभिनेत्याच्या भूमिकेत त्या पात्राला योग्य न्याय दिला आहे . 

Web Title: New story will be seen in 'Gulmohar' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.