कॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 07:36 AM2018-04-26T07:36:37+5:302018-04-26T13:06:37+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातील वातावरण आता सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे. सकाळची सुरुवात शांततेच होणार असून ऋतुजा आणि ...

A new task will be played in the Big Boss house for Captain's chair | कॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क

कॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क

googlenewsNext
र्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातील वातावरण आता सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे. सकाळची सुरुवात शांततेच होणार असून ऋतुजा आणि पुष्करचा एक धम्माल डान्स प्रेक्षकांन बघायला मिळणार आहे. ऋतुजाची एक वेगळी बाजू, कला आज प्रेक्षकांना दिसणार आहे. पुष्कर तर उत्तम डान्सर आहेच पण या डान्समध्ये ऋतुजा त्याला डान्स शिकवताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये नियमांना खूप महत्व असते. घरातील कुठलाही रहिवाशी बिग बॉसने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही, आणि असे केल्यास त्याला शिक्षा देण्यात येते. असेच काहीसे विनीत भोंडे बद्दल झाल्याचे दिसून येते. पहिल्या दिवसापासून विनीत भोंडेला त्याचा माईक विसरण्याची सवय आहे. इतकेच नव्हे तर कॅप्टनसीच्या दरम्यान देखील त्याची ही सवय गेली नाही. याच कारणामुळे तो आता बिग बोसच्या शिक्षेस पात्र ठरणार आहे. विनीतच्या या बेफिकीर स्वभावावर घरतल्या इतर मंडळींनी देखील बऱ्याचदा आक्षेप घेतल्याचे दिसून आले आहे. 

बिग बॉसच्या घरातील आता खुर्ची सम्राट हा टास्क संपला असून या टास्क मध्ये टीम आस्ताद विजयी ठरल्याचे काल बिग बॉसने सांगितले आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. या टास्क दरम्यान घरामध्ये बरेच वाद आणि राडे झाले मग ते जुईचे चक्कर येऊन पडणे असो, वा टीम आस्तादचे टीम रेशमला खुर्चीवरून उठविण्यासाठी केलेला प्रयत्न असो. आज बिग बॉस घराच्या नव्या कॅप्टनसीसाठी एक नव्या टास्कची घोषणा करणार आहेत. या घोषणेदरम्यान बिग बॉस यांनी या टास्कचे काही नियम आणि कॅप्टनचे घरातील महत्त्वदेखील स्पर्धकांना सांगितले. कॅप्टनचे घरातील महत्व मोठे असून कार्यादरम्यान कॅप्टनने स्पर्धकांना प्रोत्साहन देणे महत्वाचे असते. घरातील नियम मोडणार नाहीत काळजी घेणे तसेच शांत डोक्याने ही जबाबदारी पार पाडणे कसोटीचे असते. कॅप्टनमध्ये किती सहनशीलता आहे, हे या गोष्टीवर अवलंबून असते. “कॅप्टनसी विंग” हे कार्य कॅप्टनसीच्या उमेदवारांसाठी आहे. या कार्यादरम्यान कुठलाही स्पर्धक शक्तीचे प्रदर्शन न करता बुद्धीचा वापर करून विंग वरून प्रतिस्पर्धकाला हात सोडविण्यास भाग पाडू शकतो असा बिग बॉसने आदेश दिला.

Web Title: A new task will be played in the Big Boss house for Captain's chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.