लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत लक्ष्मी, आर्वी आणि अबोली येणार एकमेकांसमोर, जाणून घ्या काय होणार पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 06:30 AM2019-03-09T06:30:00+5:302019-03-09T06:30:01+5:30
लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये लक्ष्मी, आर्वी आणि अबोली या तिघी लवकरच एकमेकींसमोर येणार आहेत. पहिल्यांदच तीन नायिका एकमेकांसमोर येणार असून हे त्रिकुट एकत्र आल्यावर प्रेक्षकांना मालिकेमध्ये बऱ्याच घटना मिळणार हे निश्चित.
कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड लाडकी असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेमध्ये नुकतीच अबोलीची एन्ट्री झाली आहे. ही भूमिका देखील प्रेक्षकांना भावत आहे. अबोलीची भूमिका केतकी चितळे साकारत असून तिच्या येण्याने लक्ष्मी, मल्हार आणि अजिंक्यच्या आयुष्यात बरेच बदल होणार हे नक्की. मल्हारचं लक्ष्मीवर वाढत असलेले प्रेम तसेच बायको म्हणून लक्ष्मीने त्याच्यासोबत सुखाचा संसार करावा अशी मल्हारची असलेली इच्छा लक्ष्मीला मात्र मान्य नाही. हे घडत असतानाच आता मालिका एका रंजक वळणावर येणार आहे. लक्ष्मीच्या ताई म्हणजेच आर्वी मालिकेमध्ये लवकरच परतणार आहेत.
लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये लक्ष्मी, आर्वी आणि अबोली या तिघी लवकरच एकमेकींसमोर येणार आहेत. पहिल्यांदच तीन नायिका एकमेकांसमोर येणार असून हे त्रिकुट एकत्र आल्यावर प्रेक्षकांना मालिकेमध्ये बऱ्याच घटना मिळणार हे निश्चित. तसेच आर्वी अचानक कुठे गायब झाली या मागचे कोडे देखील सुटणार आहे. या तिघींचा सामना झाल्यावर मालिकेमध्ये नक्की काय घडणार? कोणाचं आयुष्य बदलणार? लक्ष्मी येणाऱ्या अडचणीमधून कसा मार्ग काढणार? हे बघणे रंजक असणार आहे.
नुकतीच अबोली लक्ष्मी आणि मल्हारचं बोलणं ऐकते आणि तिला हे समजत की, मल्हारचे लक्ष्मीवर प्रेम आहे. मल्हारचे लक्ष्मीवर प्रेम आहे हे कळल्यापासून अबोली आता पूर्ण प्रयत्नामध्ये आहे की, मल्हारला लक्ष्मीपासून कसे दूर करता येईल. त्यासाठी अबोली सगळे डाव – सगळी कारस्थानं करत असतानाच आर्वी देशमुख घरात लवकरच परतणार आहे. आर्वीच्या येण्याने लक्ष्मीचं आयुष्य बदलणार आणि त्यामुळे नात्यांचा गुंता देखील वाढणार आहे. आर्वीच्या येण्याने मालिकेला एक वेगळेच वळण मिळणार आहे, या सगळ्यांची आयुष्य बदलणार हे नक्की. मालिकेमध्ये आता नक्की काय घडेल हे प्रेक्षकांना लक्ष्मी सदैव मंगलम मालिकेमध्ये सोम ते शनिवारी संध्याकाळी ७.०० वाजता फक्त कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.