'जीव झाला येडापिसा' नवं वळण, कोणत्या चुकीची सिद्धी शिवाला देणार शिक्षा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 04:48 PM2019-07-05T16:48:15+5:302019-07-05T17:02:24+5:30

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये शिवा आणि सिद्धीचे नातं गुंतागुंतीचे झाले आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धी शिवाचं घर सोडून गेली आणि त्याच्यासोबत परत घरी जाण्यास तिने साफ नकार दिला.

New twist come in jeev zala yedapisa serial | 'जीव झाला येडापिसा' नवं वळण, कोणत्या चुकीची सिद्धी शिवाला देणार शिक्षा ?

'जीव झाला येडापिसा' नवं वळण, कोणत्या चुकीची सिद्धी शिवाला देणार शिक्षा ?

googlenewsNext

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये शिवा आणि सिद्धीचे नातं गुंतागुंतीचे झाले आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धी शिवाचं घर सोडून गेली आणि त्याच्यासोबत परत घरी जाण्यास तिने साफ नकार दिला. परंतु आत्याबाईच्या सांगण्यावरून तिने घरी यावं आणि आत्याबाईची बदनामी होऊ नये म्हणून शिवाने संपूर्ण गावासमोर सिद्धीची माफी मागितली. यानंतर सगळच चित्र बदललं. सिद्धी शिवासोबत त्याच्या घरी परत आली. मंगल अजूनही तिच्यावर नाराज आहेच, पण सोनी आणि काकू मात्र खुश आहे. त्यादिवसापासून शिवाच्या वागण्यामध्ये अचानक झालेला बदल बघून सिद्धीसोबत घरातील सगळेच आश्चर्यचकित आहेत. आत्याबाईच्या सांगण्यावरून आता शिवा सिद्धीचे मन  जिंकण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करू लागला आहे. जसे सिद्धीच्या आवडत्या फुलांचा तिच्यावर वर्षाव करण, तिची काळजी घेण, तिला सरप्राईज देण, तिच्या आई वडिलांची चौकशी करण. शिवाच्या अशा वागण्याने सिद्धीसमोर मोठा प्रश्न आहे, कि शिवा असे का वागत आहे ? येत्या रविवारच्या भागामध्ये शिवा आणि सिद्धी दोघेच घरामध्ये असणार आहेत. सिद्धीच्या मनामध्ये शिवाबद्दल अजूनही द्वेषच आहे आणि तेच शिवाच्या बाबतीत देखील आहे. पण, आत्याबाईच्या सांगण्यानुसार त्याला सिद्धीशी चांगले वागण्यापासून पर्याय नाहीयं...

आता घरामध्ये दोघेचं असल्याने काय गंमतीदार किस्से होतील, शिवा सिद्धीसाठी काय काय गोष्टी करेल ? या गंमती जमती होत असताना अशी कुठली चूक शिवाच्या हातून घडणार ज्याची शिक्षा सिद्धी त्याला देणार ? हे बघणे रंजक असणार आहे. 

Web Title: New twist come in jeev zala yedapisa serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.