सेजल शर्माच्या आत्महत्या प्रकरणात आला नवा ट्विस्ट, संशयाची सुई बॉयफ्रेंडवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 12:17 PM2020-01-26T12:17:29+5:302020-01-26T12:19:57+5:30

सेजलच्या आत्महत्या प्रकरणात आता एक ट्विस्ट आला आहे. पोलिसांच्या संशयाची सुई आता तिच्या बॉयफ्रेंडवर येऊन थांबली आहे.

New twist in Dil Toh Happy Hai Ji actress Sejal Sharma commits suicide | सेजल शर्माच्या आत्महत्या प्रकरणात आला नवा ट्विस्ट, संशयाची सुई बॉयफ्रेंडवर

सेजल शर्माच्या आत्महत्या प्रकरणात आला नवा ट्विस्ट, संशयाची सुई बॉयफ्रेंडवर

googlenewsNext
ठळक मुद्देसेजलचा बॉयफ्रेंड एक स्ट्रगलिंग मॉडेल असून त्याच्याच फोनमुळे सेजलच्या आत्महत्येविषयी पोलिसांना कळले होते. तिचा बॉयफ्रेंड आदित्य गुज्जरने मीरा रोड पोलिस स्टेशनला फोन करून सेजल फोन उचलत नसल्याचे कळवले होते.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माने तिच्या राहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. सेजल मीरा रोड येथे तिच्या दोन रूम मेट सोबत राहात होती.

काशमिरा पोलिस स्थानकात सेजलच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पाच वाजता पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सेजलला पाहाण्यात आले होते. सेजलच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट सापडली असून तिने यात आत्महत्येमागचे कारण लिहिले आहे. तिच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरविले जाऊ नये असे तिने सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. सेजल ही केवळ 26 वर्षांची होती. तिने स्टार प्लसवरील दिल तो हॅपी है जी या मालिकेत काम केले होते.

सेजलच्या आत्महत्या प्रकरणात आता एक ट्विस्ट आला आहे. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांच्या संशयाची सुई आता तिच्या बॉयफ्रेंडवर येऊन थांबली आहे. तिचा बॉयफ्रेंड एक स्ट्रगलिंग मॉडेल असून त्याच्याच फोनमुळे सेजलच्या आत्महत्येविषयी पोलिसांना कळले होते. तिचा बॉयफ्रेंड आदित्य गुज्जरने मीरा रोड पोलिस स्टेशनला फोन करून सेजल फोन उचलत नसल्याचे कळवले होते. एवढेच नव्हे तर तिने आत्महत्या केली असल्याचा संशय देखील त्याने व्यक्त केला होता. सेजलने आत्महत्या करण्यापूर्वी सेजल आणि आदित्य यांचे फोनवर संभाषण झाले होते. त्यामुळे त्यांच्यात काय बोलणे झाले, ज्यामुळे सेजलने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले याचा शोध पोलिस घेणार आहेत. 

आदित्य दिल्लीत राहात असून मुंबई पोलिसांनी त्याला चौकशीसाठी मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. आदित्य दिल्लीचा असला तरी काही महिन्यांपूर्वी सेजल आणि आदित्य वर्सोवा येथे एकत्र राहात होते. त्यानंतर मीरारोडमध्ये सेजल शिफ्ट झाल्यानंतरही तो तिथे तिच्यासोबतच राहात होता. त्यांच्या नात्याविषयी सेजलच्या कुटुंबियांना देखील कल्पना होती. पण गेल्या दोन दिवसांपासून आदित्य आणि सेजलमध्ये वाद सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. आदित्य लवकरच मुंबईत येणार असल्याचे त्याच्या आईने पोलिसांशी बोलताना सांगितले असून सेजलच्या फोनद्वारे काही माहिती मिळते का यासाठी सेजलचा फोन जप्त करण्यात आाला आहे. 

Web Title: New twist in Dil Toh Happy Hai Ji actress Sejal Sharma commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.