'आई कुठे काय करते'मध्ये नितीनचा गौप्यस्फोट, अनिरुद्धनं चोरले वीणाचे ५० लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 01:06 PM2023-06-19T13:06:39+5:302023-06-19T13:07:14+5:30

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्धने वीणाच्या कंपनीत चोरी केल्याचे सत्य अखेर सर्वांसमोर येणार आहे.

New twist in 'Aai Kuthe Kay Karte', Anirudh stole Rs 50 lakh from Veena | 'आई कुठे काय करते'मध्ये नितीनचा गौप्यस्फोट, अनिरुद्धनं चोरले वीणाचे ५० लाख रुपये

'आई कुठे काय करते'मध्ये नितीनचा गौप्यस्फोट, अनिरुद्धनं चोरले वीणाचे ५० लाख रुपये

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे या मालिकेची क्रेझ आजही कायम आहे. दरम्यान आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्धने वीणाच्या कंपनीत चोरी केल्याचे सत्य अखेर सर्वांसमोर येणार आहे. 

'आई कुठे काय करते'मध्ये प्रसारीत झालेल्या भागात आप्पा कांचन आजीची आठवण काढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे वीणाची चिंता व्यक्त करत अनिरुद्ध आशुतोषला टोमणा मारतो. अनिरुद्ध म्हणताना दिसतो की, वीणाला जेव्हा तिच्या जवळच्या लोकांची गरज असते. त्यावेळी तिची माणसं तिच्यासोबत नसतात. दरम्यान आशुतोषच्या ऑफिसमध्ये नितीन वीणाच्या कंपनीचे अकाऊंट्स चेक करत असतो. त्यावेळी त्याच्या लक्षात येते की, ५० लाख रुपये कोणीतरी नोंद न करता काढले आहेत. त्यावेळी अनिरुद्धने गोंधळ घातल्याचा संशय त्याला येतो. त्यानंतर अनिरुद्ध केबिनमध्ये गेल्यानंतर नितीन त्याला थेट विचारतो की, अनिरुद्ध तू काही लपवतो आहेस का? त्यामुळे आता अनिरुद्ध यावर काय उत्तर देणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

सध्या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पाहायला मिळत आहे की अनिरुद्ध वीणाकडून सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. तसेच अरुंधती आणि आशुतोषला नितीन अनिरुद्धने चोरी केल्याचे सांगतो. अनिरुद्धने वीणाला फसवून तिच्या कंपनीतून ५० लाख रुपयांची चोरी केली आहे. त्यामुळे आगामी भागात काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: New twist in 'Aai Kuthe Kay Karte', Anirudh stole Rs 50 lakh from Veena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.