'नवा गडी नवं राज्य' उत्कंठावर्धक वळणावर,आनंदी वर्षाला न्याय मिळवून देण्यात ठरेल का यशस्वी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 20:18 IST2023-06-21T20:18:24+5:302023-06-21T20:18:46+5:30
Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' मालिका एका रोमांचक वळणावर आली आहे.

'नवा गडी नवं राज्य' उत्कंठावर्धक वळणावर,आनंदी वर्षाला न्याय मिळवून देण्यात ठरेल का यशस्वी?
'नवा गडी नवं राज्य' (Nava Gadi Nava Rajya) या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आनंदी, राघव, रमा, वर्षा, चिंगी या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. नुकतेच या मालिकेत अभिनेता सौरभ गोखलेची एन्ट्री झाली आहे. त्याने मालिकेत अॅडव्होकेट विराज इनामदारची भूमिका साकारली आहे. कॉलेजपासून सर्व गोष्टींमध्ये राघवचा प्रतिस्पर्धी राहिलेला आणि राघवला नेहमी कमी दाखवण्याच्या प्रयत्नात असलेला विराज राघवसाठी काही नवीन आव्हान घेऊन येणार का? राघव या आव्हानांना कसा समोर जाईल? हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान आता ही मालिका एका रोमांचक वळणावर आली आहे.
राघवला अतुलच्या विरोधात पुरावे सापडतात आणि तो हे आनंदीला सांगतो. हे वर्षा ऐकून अतुलला फोन करुन घाबरवण्यासाठी सांगते. मात्र अतुल राघवला मारहाण करतो. त्यामुळे राघव सध्या स्वतःच्या पायावर उभादेखील राहू शकत नाही. त्यामुळे तो वर्षाची केस न लढण्याचा निर्णय घेतो. मात्र आनंदीला त्याचा हा निर्णय पटलेला नाही. मग राघवची अवस्था बरी नाही हे सिद्ध करण्यासाठी कोर्टात बोलावतात.
आनंदीला अतुलच्या विरोधात मिळतो पुरावा
कोर्टात राघवची भेट अतुलशी होते आणि राघवला सर्व आठवते. त्यामुळे राघव परत केस लढण्याचा निर्णय घेतो. दुसरीकडे आनंदीला अतुलच्या विरोधात पुरावा मिळतो. तो पुरावा काय असेल व त्याच्या जोरावर वर्षाला न्याय मिळेल का ? हे जाणून घ्यायचे असेल 'नवा गडी नवं राज्य'चा आगामी भाग पाहावा लागेल.