होळीमध्ये सावली आणि सारंगच्या नात्यात फुलतील प्रेमाचे रंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:36 IST2025-03-12T14:35:34+5:302025-03-12T14:36:11+5:30

Savalyanchi Janu Savali serial : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सावली आणि सारंगची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे.

new twist in Savalyanchi Janu Savali serial, savali and sarang love each other | होळीमध्ये सावली आणि सारंगच्या नात्यात फुलतील प्रेमाचे रंग?

होळीमध्ये सावली आणि सारंगच्या नात्यात फुलतील प्रेमाचे रंग?

'सावळ्याची जणू सावली' मालिके(Savalyanchi Janu Savali serial)ने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सावली आणि सारंगची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. आता सावली आणि सारंगमध्ये हळूहळू प्रेम फुलताना दिसत आहे. दरम्यान  सारंग हॉस्पिटलमधून घरी आलाय. तर सावलीला एका संगीत स्पर्धेची माहिती मिळालेय. पण सराव करतानाच सारंगची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. ऐश्वर्या सावलीला सारंगसंबंधी अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करते, पण पहिल्यांदाच सावली ऐश्वर्या विरुद्ध मेहेंदळे कुटुंबासमोर ठामपणे उभी राहणार आहे.

 सारंग बरा होत असतानाच सावलीला त्याच्याप्रती असलेल्या काळजीमुळे वैयक्तिकरित्या तिचे आभार मानतो. सारंग सखदेवला मदतीचा हात पुढे करतो, पण सावली आणि सखदेव दोघेही यासाठी नकार देतात. तिलोत्तमा होळीसाठी तारा आणि भैरवीला आमंत्रित करते. होळीच्या दिवशी सावलीला, तारा आणि सोहम एकमेकांना मिठी मारताना दिसतात. त्याच क्षणी तारा आणि सोहम सावलीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देतात.


सावलीला मनापासून ताराच्या आणि सोहमच्या नात्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, सारंग सावलीला महापूजेच्या विधीसाठी बोलावतो. सावली महापूजेचे सगळे विधी पार पाडते. पण हा त्यांचा आनंद अल्पकाळ टिकणारा ठरतो. ऐश्वर्याला अस्मीचा फोन येतो आणि त्याच वेळी जगन्नाथला गुंडांकडून धक्कादायक बातमी मिळते. काय असणार ही धक्कादायक बातमी ? होळी मध्ये सावली आणि सारंगच्या नात्याला नवीन वळण मिळेल? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: new twist in Savalyanchi Janu Savali serial, savali and sarang love each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.