'शिवा' मालिकेत नवा ट्विस्ट; शिवावर आशुतोषच्या कवितेची जादू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 06:04 PM2024-02-23T18:04:51+5:302024-02-23T18:05:10+5:30
Shiva Serial : झी मराठी वाहिनीवर नुकतीच शिवा मालिका (Shiva Serial) भेटीला आली आहे. आता ही मालिका प्रत्येक भागात एक मनोरंजक वळण घेत आहे.
झी मराठी वाहिनीवर नुकतीच शिवा मालिका (Shiva Serial) भेटीला आली आहे. या मालिकेतून येऊ कशी तशी मी नांदायला फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्री पूर्वा फडकेला त्याची नायिका बनण्याची संधी मिळाली आहे. तिखट स्वभावाची शिवा आणि गोड स्वभावाचा आशु यांची ही कहाणी मालिकेत पाहायला मिळणार आहे. आता ही मालिका प्रत्येक भागात एक मनोरंजक वळण घेत आहे.
आशु आणि शिवाची जोडी प्रेक्षकांना भावते आहे, तसेच शिवा आणि तिची पाना गँग मालिकेत मजा आणत आहे. येणाऱ्या भागात प्रेक्षक पाहू शकतील दिव्याला भेटून आशुतोषच्या कुटुंबातील सगळे प्रभावित होतात. आशुतोष आणि दिव्याच्या साखरपुड्याबद्दल शिवाला कळत. त्यात वंदनाचे वागण शिवाला भावनिक बनवतं. शिवा आपल्या मनातल्या वेदना मित्रांसमोर व्यक्त करते तेव्हाच आशुतोषने लिहिलेली कविता शिवाच्या हातात पडते. हे सर्व घडत असताना आशु आणि शिवा मध्ये एक नवीन नातं तयार होण्याची आशा दिसते.
आशूच्या कवितेने शिवाच्या मनात नवीन भावना निर्माण होतात. असं काय आहे आशुतोषच्या कवितेत? शिवा आणि आशुतोष मध्ये मेत्रीच नातं निर्माण होईल का? दिव्या आणि आशुतोषच्या नात्याचं काय आहे भविष्य? हे सगळं 'शिवा'च्या येणाऱ्या भागात पाहायला मिळेल.