‘साथ दे तू मला’ या मालिकेला मिळणार हे वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 07:15 AM2019-05-02T07:15:00+5:302019-05-02T07:15:01+5:30

‘साथ दे तू मला’ या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि समीरचं लग्न अवघ्या काही दिवसांवर असताना समीर प्राजक्तासमोर एक सत्य उघड करणार आहे.

New Twist in Star Pravah's Saath De Tu Mala | ‘साथ दे तू मला’ या मालिकेला मिळणार हे वळण

‘साथ दे तू मला’ या मालिकेला मिळणार हे वळण

googlenewsNext
ठळक मुद्देनोकरीसाठी समीरकडून नकार मिळाल्यावर आता प्राजक्ता काय निर्णय घेणार याची उत्सुकता निर्माण झालीय. या निर्णायक प्रसंगी प्राजक्ता करिअरला प्राधान्य देणार की लग्नाचा प्रस्ताव नाकारणार याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘साथ दे तू मला’ या मालिकेच्या यापुढील भागांमध्ये पाहा

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेल्या ‘साथ दे तू मला’ या मालिकेला आणि मालिकेच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. खूपच कमी दिवसांत ही मालिका, या मालिकेतील सगळीच पात्रं प्रचंड फेमस झाली आहेत. राहुल वैद्य आणि केतकी माटेगावकरने गायलेले या मालिकेचे शीर्षकगीत तर रसिकांच्या ओठी रुळलेले आहे.

आपली स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्या प्राजक्ता या मुलीची गोष्ट या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा असणाऱ्या प्राजक्ताला आपल्या क्षेत्रात खूप नाव कमवायचंय अगदी लग्नानंतरसुद्धा. करिअरसाठी सबकुछ कुरबान असं मानणाऱ्यातली ती नाही. घर-संसार सांभाळून तिला तिच्या स्वप्नांना गवसणी घालायची आहे. खरंतर घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत कुशलरित्या सांभाळणाऱ्या तमाम स्त्रियांचं प्राजक्ता प्रतिनिधित्व करत आहे आणि म्हणूनच ‘साथ दे तू मला’ या मालिकेची गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटत आहे.

‘साथ दे तू मला’ या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि समीरचं लग्न अवघ्या काही दिवसांवर असताना समीर प्राजक्तासमोर एक सत्य उघड करणार आहे. प्राजक्ताने लग्नानंतर नोकरी करू नये अशी समीरच्या आईची इच्छा आहे. आयुष्यभर संसारासाठी खस्ता खालेल्या आईची समीर इच्छा मोडणार कशी? यासोबतच प्राजक्ताच्या स्वप्नांचं काय होणार? अशा द्विधा मनस्थितीत अडकलेला समीर अखेर प्राजक्ताला लग्नानंतर नोकरी न करण्याचा सल्ला देणार आहे. समीरच्या या निर्णयाने प्राजक्ताला धक्का बसणार आहे. नोकरीसाठी समीरकडून नकार मिळाल्यावर आता प्राजक्ता काय निर्णय घेणार याची उत्सुकता निर्माण झालीय. या निर्णायक प्रसंगी प्राजक्ता करिअरला प्राधान्य देणार की लग्नाचा प्रस्ताव नाकारणार याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘साथ दे तू मला’ या मालिकेच्या यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

‘साथ दे तू मला’ या मालिकेच्या पुढील भागांमध्येही बऱ्याच इण्टरेस्टिंग घडामोडी पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी पाहायला विसरु नका साथ दे तू मला सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: New Twist in Star Pravah's Saath De Tu Mala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.