'आई कुठे काय करते'मध्ये येणार नवीन वळण, मालिकेत या अभिनेत्रीची होणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 06:54 PM2021-10-27T18:54:02+5:302021-10-27T18:54:35+5:30

'आई कुठे काय करते' या मालिकेत लवकरच नवीन वळण पाहायला मिळणार आहे.

A new twist will come in 'Aai Kuthe Kay Karte', this actress will have an entry in the series | 'आई कुठे काय करते'मध्ये येणार नवीन वळण, मालिकेत या अभिनेत्रीची होणार एन्ट्री

'आई कुठे काय करते'मध्ये येणार नवीन वळण, मालिकेत या अभिनेत्रीची होणार एन्ट्री

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. या मालिकेत लवकरच नवीन वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत लवकरच आई म्हणजे अरूंधतीच्या मित्राची एन्ट्री होणार आहे. अरूंधतीचा मित्र ही संकल्पनाच मुळात देशमुख कुटुंबियांसाठी नवीन आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मालिकेत अरूंधतीचा मित्र म्हणून अभिनेता समीर धर्माधिकारी मालिकेत दिसणार आहे. या मित्रासोबत अरूंधतीचे नाते कसे असणार आहे? याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. अरूंधतीचा हा मित्र तिला साथ देईल की आणखी कोणत्या संकटात टाकेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. समीर धर्माधिकारी अरूंधतीच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. 

सुरेखा ताईंच्या भूमिकेत दिसणार ईला भाटे
अरूंधती सध्या एका आश्रमात काम करत आहे. आश्रमातील ट्रस्टी सुरेखा ताई आश्रमला भेट देतात. त्यावेळी अरूंधतीचे गाणे त्यांच्या कानावर पडते. त्यावेळी ही कोण? असा सवाल त्या तेथील संचालिकेला विचारतात. तेव्हा अरूंधती जोगळेकर असे नाव ऐकताच ट्रस्टी विचारात पडतात. अरूंधतीच्या माहेरच्या नावाचा संंबंध याच्याशी काही आहे का? याबाबत सगळयांना उत्सुकता आहे. या मालिकेत सुरेखा ताईंच्या भूमिकेत अभिनेत्री ईला भाटे पहायला मिळणार आहेत. त्या बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. 

Web Title: A new twist will come in 'Aai Kuthe Kay Karte', this actress will have an entry in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.