'मन उडू उडू झालं'मध्ये उत्कंठावर्धक वळणं, दिपूला मिळवण्यासाठी इंद्रा देणार अग्निपरीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:30 PM2022-06-03T13:30:22+5:302022-06-03T14:56:52+5:30
छोट्या पडद्यावर सुरु असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे मन उडू उडू झालं.कायम इतरांसाठी धडपड करणारी दिपू आज आयुष्याची लढाई लढत आहे.
छोट्या पडद्यावर सुरु असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. सध्या प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि दिपू अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तिच्या प्रकृतीमध्ये काही सुधार नाही झाला आहे. तिच्या या अवस्थेमुळे देशपांडे कुटुंबीय आणि इंद्रा खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत. रविवारी प्रसारित होणाऱ्या एक तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक पाहू शकतील कि दिपूची प्रकृती खूप खालावणार आहे. सानूमुळे दिपू मृत्यूशी झुंज देत आहे. कायम इतरांसाठी धडपड करणारी दिपू आज आयुष्याची लढाई लढत आहे
डॉक्टर देशपांडे कुटुंबियांना दिपूला काहीही होऊ शकतं असं म्हणतात. हे ऐकून इंद्राच्या पायाखालची जमीन सरकते आणि दिपूला सुखरूप परत मिळवण्यासाठी इंद्रा अग्निपरीक्षा द्यायचं ठरवतो.
या अग्निपरीक्षेत त्याच्या मार्गात खूप अडथळे येतात. इंद्रा अडथळ्यांवर मात करू शकेल ? इंद्राच्या अग्निपरीक्षेमुळे दिपूचे प्राण वाचणार का? हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.