फुलाला सुगंध मातीचा मालिकेत एक नव्हे तर तब्बल दोन अभिनेत्रींची होणार एंट्री, जाणून घ्या त्यांच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 05:31 PM2022-03-05T17:31:14+5:302022-03-05T17:36:17+5:30

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला खूपच कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत.

New two actresses will take entry in the serial phulala sugandh maticha | फुलाला सुगंध मातीचा मालिकेत एक नव्हे तर तब्बल दोन अभिनेत्रींची होणार एंट्री, जाणून घ्या त्यांच्याविषयी

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत एक नव्हे तर तब्बल दोन अभिनेत्रींची होणार एंट्री, जाणून घ्या त्यांच्याविषयी

googlenewsNext

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला खूपच कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेचा टीआरपी देखील खूप चांगला असून या मालिकेची कथा, कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांना चांगलेच भावत आहेत.

या मालिकेतील कर्तिकीचं आता IPS ऑफिसर होण्याचं ट्रेनिंग सुरू झालं आहे. मराठी मनोरंजन ऑफिशलच्या रिपोर्टनुसार मालिकेत नव्या अभिनेत्रींची एंट्री होणार आहे. कार्तिकची ट्रेनर अग्रीमा पाटीलची भूमिका अभिनेत्री मानसी कुलकर्णी साकारणार आहे तर कार्तिकी सारखंच ट्रेनीची भूमिकेत केतकी विलास दिसणार आहे. या दोन नव्या अभिनेत्रींच्या एंट्रीमुळे काय नवा ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मानसी कुलकर्णीबाबत बोलायचं झालं तर ‘झी मराठी’वरील ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. मानसीने ‘फु बाई फु’  ‘१७६० सासूबाई’ या मालिकेतही तिने काम केलं आहे. १७६० सासूबाई’ मध्ये तिने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या सुनेच्या भूमिका साकारली होती.

केतकी विलास याआधी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मध्ये दिसली होती. तिन जयदीपची मैत्रीण ज्योतिकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर कुसुम या मालिकेत एलिशाच्या भूमिकेत दिसली होती. यात तिने कुसुमच्या बालमैत्रिणीची भूमिका साकारली होती. 
 

Web Title: New two actresses will take entry in the serial phulala sugandh maticha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.