‘झलक दिखला जा’मध्ये न्यू ईअर सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2016 04:53 PM2016-12-30T16:53:02+5:302016-12-30T16:53:02+5:30
सर्वांच्या आवडीचा डान्स रियालिटी शो ‘झलक दिखला जा’मध्ये सरत्या वर्षांतील अनुभव व नव्या वर्षांचे धमाकेदार स्वागत करण्यासाठी सहभागी स्पर्धकांनी ...
डान्स रियालिटी शो ‘झलक दिखला जा’मध्ये नव्या वर्षांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. नव्या वर्षांत प्रेक्षकांसमोर काहीतरी नवे सादरीकरण करण्यासाठी सलमान युसूफ खान व त्याची पार्टनर ऐश्वर्या हे एका विषारी कोळीच्या (स्पायडर) जाळ्यातून सुटका करणारे नृत्य सादर करणार आहे. हा डान्स चांगलाच प्रभावी ठरला आहे. एक्स्प्रेशन व डान्सचा सुरेख मेळ दोघांनी घातला आहे. यासोबतच ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘दिवानी मस्तानी हो गयी’ या गाण्यावर शास्त्रीय नृत्याचा नजराना लहानगी तेरिया मगर सादरीकरण करणार आहे. एबीसीडी २ मधील ऐ गणराया या गाण्यावर शंतनू महेश्वरी आपला जोरदारा पर्फामन्स सादर करणार आहेत. त्याच्या या सादरीकरणात पिरामिडचा देश इजिप्तहून आलेले कलाकार आपले नृत्याचा जलवा दाखविणार आहेत.
मात्र यात ‘झलक’चा खरा चॅम्पियन ड्वेन ब्राव्हो याच्या नृत्याचा धमाकेदार सादरीकरण पाहायला मिळेल. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या ओ ओ जाने जाना, जिने जे है चार दिन व सुल्तानमधील गाण्यावर रॉकिंग परर्फामन्स सादर करणार आहे. यावेळी तो सलमानच्या टॉवेल डान्सचा नमूना देखील पेश क रेल. या सोबतच वर्षभरातील काही भावनिक क्षणांचा मागोवा घेण्यात येणार आहे. शंतनूने आपल्या आई-वडिलांसाठी तयार केलेल्या घरासाठी उपसलेले कष्टाविषयी बोलणार आहे. मनीष पॉल आपल्या निवेदनातून सर्वांचा चाहता असलेला करण जोहर यांच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगणार आहे.
झलकच्या सेटवर झालेली मस्ती अनुभवणारी जॅकलिनचा जलवा देखील यावेळी पहायला मिळणार आहे. नव्या वर्षांचे स्वागत व सरत्या वर्षांला निरोप देण्याचा स्पेशल एपिसोड खरोखरच मजेदार ठरणार आहे.