‘गुलमोहर’मध्ये रसिकांना पाहायला मिळणार नवी प्रेमकथा 'अनामिका'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 11:10 AM2018-02-09T11:10:28+5:302018-02-09T16:40:28+5:30

छोट्या पडद्यावर नुकतीच  रसिकांच्या भेटीस आलेली 'गुलमोहर' ही मालिका हृद्यस्पर्शी आणि सुंदर प्रेमकथांमुळे तरुणांच्या मनाचा ठाव घेत आहे.आताची पिढी ...

Newcomer 'Anamika' will be seen in 'Gulmohar' | ‘गुलमोहर’मध्ये रसिकांना पाहायला मिळणार नवी प्रेमकथा 'अनामिका'

‘गुलमोहर’मध्ये रसिकांना पाहायला मिळणार नवी प्रेमकथा 'अनामिका'

googlenewsNext
ट्या पडद्यावर नुकतीच  रसिकांच्या भेटीस आलेली 'गुलमोहर' ही मालिका हृद्यस्पर्शी आणि सुंदर प्रेमकथांमुळे तरुणांच्या मनाचा ठाव घेत आहे.आताची पिढी प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेली आहे,मग ते प्रेमी असतील,आई,वडील किंवा भावंडांच्या संदर्भातील असेल. ते त्यांच्या जीवनातील प्रेमाची किंमत हरवून बसले आहेत.गुलमोहर या मालिकेमधून प्रत्येक आठवड्याला खरे प्रेम काय असते हे वेगवेगळ्या प्रेमकथांमधून तरुणांना दाखवले जात आहे.या आठवड्यात गुलमोहर'अनामिका' ही कथा सादर करणार आहे.भिन्न स्वभावाचे दोन जे शेवटी एकमेकांच्या प्रेमात पडतील किंवा नाही हे पाहणे रंजक ठरेल.अनामिका या आगामी कथे मध्ये मराठी रंगभूमी आणि सिनेमातील दोन नावाजलेले कलाकार पर्ण पेठे आणि अक्षय टांकसाळे छोट्या पडद्यावर मधुरा आणि श्रेयस यांची भूमिका करताना दिसणार आहेत. मधुरा ही अगदी साधी आणि सरळमार्गी मुलगी आहे तर श्रेयसचे व्यक्तिमत्व त्याच्या अगदी विरुद्ध आहे. अतिशय श्रीमंत कुटुंबात जन्मलेला श्रेयस अगदी मोकळ्या वातावरणात वाढला आहे, तसेच तो वडिलांच्या खूप जवळचा आणि लाडका मित्र आहे. मधुराला लिहिण्याची खूप आवड आहे आणि तिचे विचार तिला कागदावर लिहीण्याची आवड आहे.ती खूप सर्जनशील आहे आणि ती वेगवेगळ्या कथा लिहिण्याचा आनंद घेत असते. एका विशिष्ट दिवशी, श्रेयस मधुराने लिहिलेली कथा वाचतो आणि लगेच तिच्या प्रेमात पडतो. पण श्रेयस कथेच्या की कथा लिहिणारीच्या प्रेमात पडतो हा प्रश्नच आहे?अनामिकसाठी चित्रीकरण करण्याचा अनुभव सांगताना पर्ण पेठे म्हणाली,''माझ्या व्यक्तिमत्वापेक्षा अगदी वेगळी असलेली मधुराची आव्हानात्मक भूमिका मी स्विकारली. मंदार देवस्थळीसारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे ही माझ्यासाठी खूप खास गोष्ट आहे.अनामिका ही गोष्ट अतिशय लक्षवेधक आहे आणि प्रेक्षकांना ती खूप आवडेल.यामध्ये फक्त प्रेमिकांचेच नाही तर आई-मुलगी, शिक्षक-विद्यार्थी, मित्रत्व अशा अनेक नात्यांचे वर्णन केलेले आहे.''

पहिल्या कथेत श्रेयस तळपदे आणि गिरिजाची ओक स्माईल प्लिज प्रेक्षकांना पाहायला मिळाले.यांत प्रेम आणि प्रेमापेक्षाही अतिशय वेगळ्या दर्जाचे बॉण्डिंग या कथेद्वारे उलगडताना पाहायला मिळाले होते.श्रेयस आणि गिरिजा यांच्या व्यतिरिक्त मालिकेत उदय सबनीस आणि उदय टिकेकर सुद्धा महत्वाच्या झळकले होते.

Web Title: Newcomer 'Anamika' will be seen in 'Gulmohar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.