नई नवेली दुल्हन गौहर खानने पतीलाच घेतले उचलून, फोटोने वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 03:21 PM2020-12-29T15:21:40+5:302020-12-29T15:26:20+5:30
लग्नावेळी गौहर खानने पेस्टल रंगाचा वेडिंग आऊटफिट परिधान केला होता. या वेडिंग लूकसोबत तिने भरजरी दागिने घातले होते. जैदनेही क्रीम कलरची शेरवानी परिधान केला होता. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते.
अभिनेत्री गौहर खान नुकतीच जैद दरबारसह लग्न बंधनात अडकली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी आपल्या निकाहची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. या निकाहचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला. या लग्नसमारंभातील आणखीन काही फोटो समोर आले आहेत. सध्या हे फोटो सा-यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
कारण या फोटोत नववधू गौहरने चक्क पती जैद दरबारलाच उचलून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नामध्ये असे यापूर्वी तरी कधी पाहण्यात आले नसावे. त्यामुळे गौहरचा हा फोटो पाहून नक्कीच धाकड दुल्हन गौहर खान हेच तंतोतंत लागू ठरते. हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत लाईक्स आणि कमेंटसचाही वर्षाव करत आहते.
या दोघांमध्ये वयाचेही अंतर जास्त आहे. गौहर जैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याचे बोलले जाते. वयातील अंतराव जेव्हा चर्चा रंगल्या तेव्हा गौहरने होणा-या चर्चांना पूर्ण विराम लागावा म्हणून १२ वर्षाचे अंतर नसल्याचे सांगिले होते.तर दुसरीकडे जैदला या गोष्टीचा अजिबात फरक पडत नसल्याचे म्हटले होते.
लग्नावेळी गौहर खानने पेस्टल रंगाचा वेडिंग आऊटफिट परिधान केला होता. या वेडिंग लूकसोबत तिने भरजरी दागिने घातले होते. जैदनेही क्रीम कलरची शेरवानी परिधान केला होता. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते.
लग्नानंतर एक रिसेप्शन पार्टीसुद्धा आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मित्र मैत्रिणी यांना शुभेच्छा द्यायला उपस्थित होते. या पार्टीमध्ये सगळ्यांनी धमाल केली आणि महत्वाचं म्हणजे गौहरनेसुद्धा या रिसेप्शन पार्टीत जबरदस्त डान्स करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या तिच्या या संगीत सेरेमनीचा व्हिडीओही तुफान व्हायरल झाला आहे.
फ्लाईटमध्ये अचानक भेटली गौहर खान, एक्स-बॉयफ्रेन्ड कुशाल टंडन म्हणाला, हाय किस्मत
कुशाल व गौहर हे दोघेही एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉस 7च्या घरातच त्यांच्यात प्रेम बहरले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही काही काळ हे प्रेम कायम होते. मात्र अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली. काही कारणास्तव दोघेही एकमेकांपासून दूर झालेत. पुढे दोघांनीही आपआपले मार्ग निवडत, त्यात बिझी झालेत. दोघांचा ताजा व्हिडीओ बघता, कुशाल व गौहर जुन्या सगळ्या आठवणी विसरलेत, असे दिसतेय. आता दोघांमध्येही आहे ती केवळ चांगली मैत्री.