या अभिनेत्रीला ट्रोलरने म्हटले पृथ्वीवरची सर्वाधिक कुरूप अभिनेत्री, असे मिळाले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 11:09 AM2019-11-25T11:09:33+5:302019-11-25T11:10:26+5:30

सोशल मीडियाद्वारे स्टार्स आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात, हे खरे. पण अलीकडे सोशल मीडियावरचे ट्रोलर्स अनेक स्टार्ससाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत.

nia sharma called ugly overrated naagin 4 actress befitting reply to troll |   या अभिनेत्रीला ट्रोलरने म्हटले पृथ्वीवरची सर्वाधिक कुरूप अभिनेत्री, असे मिळाले उत्तर

  या अभिनेत्रीला ट्रोलरने म्हटले पृथ्वीवरची सर्वाधिक कुरूप अभिनेत्री, असे मिळाले उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्दे2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती.

सोशल मीडियाद्वारे स्टार्स आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात, हे खरे. पण अलीकडे सोशल मीडियावरचे ट्रोलर्स अनेक स्टार्ससाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. आता टीव्ही अभिनेत्री निया शर्मा हिचेच बघा ना. ट्रोलरने निया शर्माला प्रचंड ट्रोल केले. तिच्याबद्दल असभ्य भाषेचा वापर केला. पण यामुळे न संतापता नियाने या ट्रोलरला असे काही उत्तर दिले की, त्याची बोलती बंद झाली.
ट्विटरवर मधुर गुप्ता नामक एका युजरने #NiaSharma हा हॅशटॅग वापरत नियाला ट्रोल केले. ‘निया शर्मा पृथ्वीवरच्या सर्वात कुरूप आणि ओवररेटेड सो कॉल्ड सेलिब्रिटींपैकी एक आहे . पण तिच्या पीआरला फुल आऊट ऑफ फुल मार्क्स मिळायला हवेत. कारण नसताना नियाला चर्चेत ठेवण्याचे काम पीआर टीम चोख बजावते. मुंबईतील भेलपुरीवालाही तिच्यापेक्षा अधिक कमवत असेल,’ असे या ट्रोलरने लिहिले.




खरे तर ही कमेंट वाचून कुणालाही राग येईल. पण निया अजिबात संतापली नाही. याऊलट या ट्रोलरचे ट्विट  शेअर करत, नियाने त्याला अगदी शांतपणे उत्तर दिले. ‘माझ्याकडे सध्या कुठलीही पीआर टीम नाही. मी एकदम नॅचरल आहे, बच्चा,’ असे तिने लिहिले.




निया शर्मा लवकरच एकता कपूरच्या ‘नागीन 4’मध्ये लीड भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली.



 

यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते.  इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.



 

2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50  ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती.

Web Title: nia sharma called ugly overrated naagin 4 actress befitting reply to troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.