दुबईत रोमँटिक मूडमध्ये दिसले निक्की आणि अरबाज, व्हिडीओ आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 15:27 IST2025-01-04T15:26:33+5:302025-01-04T15:27:48+5:30

Nikki Tamboli And Arbaaz Patel : निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल सध्या दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत.

Nikki and Arbaaz seen in a romantic mood in Dubai, video surfaced | दुबईत रोमँटिक मूडमध्ये दिसले निक्की आणि अरबाज, व्हिडीओ आले समोर

दुबईत रोमँटिक मूडमध्ये दिसले निक्की आणि अरबाज, व्हिडीओ आले समोर

यंदाचा बिग बॉस मराठी ५ (Bigg Boss Marathi 5)चा सीझन खूप चर्चेत आला होता. हा शो संपून अनेक दिवस उलटले असले तरी यातील काही स्पर्धक सतत चर्चेत येत असतात. त्यात अरबाज पटेल (Arbaaz Patel) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांची चर्चा अजूनही जोरदार सुरू आहे. कारण शोमध्ये ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे शोनंतर त्यांच्यातील प्रेम कायम राहील का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र ते दोघे सतत एकत्र फिरताना दिसतात. त्यामुळे ते अजून रिलेशनशीप असल्याचे बोलले जाते. दरम्यान निक्की तांबोळीने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे, त्यातून निक्की आणि अरबाज सध्या दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. 

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल सध्या दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. या व्हॅकेशनचे फोटो आणि व्हिडीओ निक्कीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती रेड बिकिनी घातली आहे आणि त्यावर व्हाइट पॅण्ट घातली आहे. तिने यात फिगरही फ्लॉन्ट केली आहे. इतकेच नाही तर अरबाज आणि ती रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे. निक्कीच्या या पोस्टवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.


वर्कफ्रंट
बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यानंतर आता निक्की 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' शोमध्ये दिसली. आपल्या कुकिंगने तिने प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, निक्की लवकरच पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ती लवकरच बदनाम चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होत आहे.

Web Title: Nikki and Arbaaz seen in a romantic mood in Dubai, video surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.