"अरबाजने गुढीपाडवा साजरा करावा गरजेचं नाही अन् मी...", निक्की तांबोळी असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:40 IST2025-04-02T11:39:54+5:302025-04-02T11:40:49+5:30

एकमेकांच्या धर्माविषयी, सणाविषयी निक्कीने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

nikki tambli talks about gudhipadwa festival marathi culture and arbaaz patel s culture | "अरबाजने गुढीपाडवा साजरा करावा गरजेचं नाही अन् मी...", निक्की तांबोळी असं का म्हणाली?

"अरबाजने गुढीपाडवा साजरा करावा गरजेचं नाही अन् मी...", निक्की तांबोळी असं का म्हणाली?

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) पाचव्या पर्वातून निक्की तांबोळी (Nikki Tamboli) मराठी प्रेक्षकांच्याही ओळखीची झाली. निक्की हिंदी बिग बॉसचाही भाग होती. नंतर तिने मराठीमध्ये एन्ट्री घेतली. बिग बॉसमध्ये वर्षा उसगांवकरांसोबत तिचे खटके उडायचे. अरबाज पटेलसोबत  (Arbaaz Patel) तिची लव्हस्टोरी सुरु झाली. अभिजीत सावंतसोबत चांगली मैत्री झाली. निक्कीचा एकंदर प्रवास आपण पाहिला. सध्या ती सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये दिसत आहे. नुकताच निक्कीने गुढीपाडवा सण साजरा केला. तर अरबाजने ईद साजरी केली. एकमेकांच्या धर्माविषयी, सणाविषयी निक्कीने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

निक्की तांबोळीने गुढीपाडव्यानिमित्त 'इन्स्टंट बॉलिवूड'ला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, "नवीन वर्ष मी नेहमीच गुढीपाडव्यालाच साजरं करते. कारण लहानपणापासून आईबाबांनी हीच शिकवण दिली आहे की गुढीपाडवा हे मराठी नववर्षाची सुरुवात असते. यंदा माझे आईवडील घरी नाहीयेत त्यामुळे मीच पुरणपोळी, श्रीखंड बनवून गुढीपाडवा साजरा करणार आहे. गुढी उभारणार आहे."


अरबाजविषयी निक्की म्हणाली,"अरबाज सध्या ईदसाठी त्याच्या घरी गेला आहे. मी त्याच्या धर्माचा आदर करते आणि तो माझ्या धर्माचा आदर करतो. मी ईदसाठी तिथे असणं गरजेचं नाही असंच त्याला वाटतं आणि त्याने गुढीपाडव्यासाठी इथे असणं गरजेचं नाही. मी एक मराठी मुलगी आहे आणि त्याची वेगळी संस्कृती आहे. आम्ही कधी असं ठरवलं नाही की एकमेकांच्या संस्कृतीचा भाग व्हायचं की नाही. आमच्यात समजूतदारपणा आहे. ईद येणार असल्याने मीही खूश आहे. तो खूश आहे कारण मी मोठी असल्याने त्याला माझ्याकडून ईदी मिळणार आहे.  तसंच दिवाळी आम्ही एकत्रच साजरी केली होती.  सध्या अरबाज रमजानचा पूर्ण एक महिना त्याच्या घरीच आहे."

Web Title: nikki tambli talks about gudhipadwa festival marathi culture and arbaaz patel s culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.