Video: टास्कदरम्यान निक्की-आर्याची झटापट! एकमेकींना ढकलत घातला गोंधळ, नवीन प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 04:23 PM2024-08-06T16:23:49+5:302024-08-06T16:25:05+5:30

बिग बॉस मराठीच्या पहिल्या कॅप्टनसी टास्कदरम्यान निक्की तांबोळी-आर्या जाधवने एकमेकींशी झटापट करुन गोंधळ घातलेला दिसतोय (bigg boss marathi 5)

nikki tamboli aarya jadhav fight each other in bigg boss marathi 5 captaincy task | Video: टास्कदरम्यान निक्की-आर्याची झटापट! एकमेकींना ढकलत घातला गोंधळ, नवीन प्रोमो समोर

Video: टास्कदरम्यान निक्की-आर्याची झटापट! एकमेकींना ढकलत घातला गोंधळ, नवीन प्रोमो समोर

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज कॅप्टनसी टास्कदरम्यान पुन्हा एकदा जोरदार राडा होताना दिसणार आहे. गेल्या आठवड्यात सदस्यांकडून नियमभंग झाल्याने बिग बॉसने कोणालाच कॅप्टन केलं नाही. त्यामुळे बिग बॉसच्या नवीन सीझनचं हे पहिलं कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. घरातल्या पहिल्याच कॅप्टनसी कार्यात आर्या जाधव आणि निक्की तांबोळीमध्ये राडा झालेला दिसतोय. त्याचा प्रोमोही व्हायरल झालाय. 

पहिल्या कॅप्टनसी कार्यात राडा

'बिग बॉस मराठी'च्या घरात आज 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' हे कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. या टास्कदरम्यान घरातील सर्व सदस्य सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे. दरम्यान बॉलिवूड गाजवणारी निक्की तांबोळी आणि रॅपर आर्या जाधवमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. एकमेकींसोबत भिडतानाचा त्यांचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये आर्या निक्कीला मला हात लावू नको असं म्हणताना दिसतेय. तर निक्की आर्याला इकडे ओरडू नको असं रागात म्हणताना दिसतेय. 


आर्याला निक्कीने पूलमध्ये ढकललं

पुढे असंही पाहायला मिळतं की आर्याला निक्कीने पूलच्या जवळ आणलं. तेव्हा इतर सदस्य अरे तिकडे स्वीमींगपूल आहे, असं निक्कीला म्हणताना दिसतात. आता निक्कीच्या ढकलण्याने आर्या खरंच स्वीमींगपूलमध्ये पडलीय का, हे आजच्या भागात कळेल. याशिवाय 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' या टास्कमध्ये कोण विजयी होणार आणि कोणाला पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळणार याकडेही सर्वांचंच लक्ष लागलं आहे. कॅप्टनला यंदा नक्की कोणते अधिकार मिळणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title: nikki tamboli aarya jadhav fight each other in bigg boss marathi 5 captaincy task

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.