हम दोनो दो प्रेमी..! अभिजीत-निक्कीची जमली जोडी, अरबाज उदास तर अंकिताची सटकली; म्हणाली- 'आज कळलं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:28 PM2024-08-26T16:28:45+5:302024-08-26T16:32:53+5:30

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो व्हायरल झालाय. यात अभिजीत-निक्कीची जोडी जमली असून A टीममधील इतर सदस्यांना चेहरे पडलेले दिसत आहेत (bigg boss marathi 5)

nikki tamboli and abhijeet sawant pair together jealous arbaz patel bigg boss marathi 5 | हम दोनो दो प्रेमी..! अभिजीत-निक्कीची जमली जोडी, अरबाज उदास तर अंकिताची सटकली; म्हणाली- 'आज कळलं...'

हम दोनो दो प्रेमी..! अभिजीत-निक्कीची जमली जोडी, अरबाज उदास तर अंकिताची सटकली; म्हणाली- 'आज कळलं...'

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा पाचवा आठवडा सुरु झालाय. या नवीन आठवड्यात घरात काय नवीन कल्ला बघायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. काल भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला चक्रview रुममध्ये बोलावल्याने निक्कीला तिच्यामागे अरबाज, वैभव, जान्हवी काय बोलतात हे कळलं. त्यामुळे निक्कीच्या मनात A टीमबद्दल राग निर्माण झालाय. अशातच बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत निक्की आणि अभिजीतची जोडी जमली असून त्यामुळे इतरांचा जळफळाट झालेला दिसतोय.

अभिजीत-निक्कीची जमली जोडी, इतरांचा चेहरा मात्र पडला

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि अभिजीत गप्पा मारताना दिसत आहेत. दरम्यान बिग बॉस म्हणतात,"अभिजीत - निक्की जोडीत बांधले गेले आहात. या परिस्थितीवर कोणतं गाणं सुचतयं?". त्यावर अभिजीत म्हणतो,"हम दोनो...". त्यानंतर घरात एकच हशा पिकतो. अभिजीतच्या गाण्यानंतर अंकिता म्हणते,"आज कळलं आम्हाला जोड्या बिग बॉसच्या घरात बांधलेल्या असतात". त्यावर अभिजीत 'कुछ तो लोग कहेंगे' हे गाणं म्हणतो. घरात हलकंफुलकं वातावरण असताना अरबाज, वैभव आणि A टीममधील इतर सदस्यांचा चेहरा मात्र पडलेला दिसतोय.


बिग बॉसच्या आजच्या भागात घडणार धमाल

बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच कमाल असणार आहे. घरातील सदस्य घाबरलेले असताना दुसरीकडे निक्की आणि अभिजीत सदस्यांना चांगलंच हसवणार आहेत. काल भाऊच्या धक्क्यावर चक्रview मुळे घरात मैत्रीची समीकरणं बदललेली दिसत आहेत. अशातच बिग बॉसने निक्की-अभिजीतला जोड्यांनी बांधल्याने घरात आणखीनच मजा आणि धमाल होणार, यात शंका नाही. 

Web Title: nikki tamboli and abhijeet sawant pair together jealous arbaz patel bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.