लग्न कधी करणार विचारताच लाजली निक्की तांबोळी, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 10:20 AM2024-11-27T10:20:40+5:302024-11-27T10:22:16+5:30
लग्न केव्हा करणार ? निक्की तांबोळी लाजत म्हणाली...
Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री निक्की तांबोळी आणि अभिनेता अरबाज पटेल (Arbaaz Patel) कायम चर्चेत असतात. 'बिग बॉस'च्या घरात त्यांची जोडी जमली तर 'बिग बॉस'च्या बाहेरही दोघांनी आपलं नात कायम ठेवलं आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. निक्की व अरबाज रिलेशनशिपमध्ये आहेत. अशातच निक्कीला ती लग्न केव्हा करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. याचं तिने उत्तर दिलं आहे.
निक्कीचा एक व्हिडीओ viralbhayan या पापाराझी अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत निक्की ही पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. यावेळी एक पापाराझी निक्कीला अरबाज आणि तिची जोडी छान दिसते असे म्हणतो. तसेच तो तिला "लग्न कधी करणार" असेही विचारतो. हे ऐकताच निक्की लाजत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पापाराझीच्या प्रश्नावर निक्की गोड स्माइल देत म्हणते, "तुम्हाला सर्वांना नेहमी हा एकच प्रश्न मला विचारण्यासाठी मिळतो का?". हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.
सध्या निक्की तांबोळी आणि अरबाझ पटेल यांची हॉट & फिट कपल म्हणून चर्चा रंगली आहे. सतत एकमेकांचा हातात हात घेऊन निक्की आणि अरबाज फिरताना दिसतात. काही दिवसांपुर्वी ते दोघे एकत्र Vacationवरही गेले होते. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली होती. निक्की ही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निक्की तांबोळी 2019 कांचना 3 चित्रपटात झळकली होती. तर 2020 मध्ये 'बिग बॉस 14'मध्ये निक्की दुसरी रनरअप ठरली. त्यानंतर ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली. 'फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी 11' मध्ये निक्की स्पर्धक होती. आता तिचे चाहते नव्या प्रोजेक्टची वाट पाहात आहेत.