एक हसीना थी, एक दीवाना था... निक्की-अरबाजच्या नव्या रोमॅंन्टिक VIDEO ची होतेय चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:43 IST2024-12-27T12:42:54+5:302024-12-27T12:43:08+5:30

 निक्की आणि अरबाजचा रोमँटिक व्हिडीओ चर्चेत आहे.

Nikki Tamboli Arbaz Patel Romantic Video Chemistry Sets Insta On Fire | Bigg Boss Marathi 5 | एक हसीना थी, एक दीवाना था... निक्की-अरबाजच्या नव्या रोमॅंन्टिक VIDEO ची होतेय चर्चा!

एक हसीना थी, एक दीवाना था... निक्की-अरबाजच्या नव्या रोमॅंन्टिक VIDEO ची होतेय चर्चा!

Arbaz Patel - Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या पर्वात एका कपलची चर्चा झाली. अभिनेत्री निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल या जोडीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडली. 'बिग बॉस मराठी'चं पर्व जरी संपलं असलं तरी निक्की आणि अरबाज आजही चर्चेतच आहेत.  दोघांच्या या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होताना दिसलं. आता दोघं कपल म्हणून अनेक ठिकाणी जोडीनं दिसत आहेत. नुकतच त्यांचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. 

 निक्की आणि अरबाजच्या जोडीला भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. दोघंही एकमेकांसोबत फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता  निक्की आणि अरबाज यांनी "एक हसीना थी, एक दीवाना था" या गाण्यावर रोमँटिक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात त्यांची पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. चाहत्यांच्या भरभरून कमेंट आणि लाईक्सही व्हिडीओवर पाहायला मिळत आहे.


 बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यानंतर आता निक्की 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' (Celebrity Master Chef ) यात दिसणार आहे.  आपल्या कुकिंगने ती प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय, निक्की लवकरच पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ती लवकरच बदनाम चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होत आहे.
 

Web Title: Nikki Tamboli Arbaz Patel Romantic Video Chemistry Sets Insta On Fire | Bigg Boss Marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.