'बिग बॉस'च्या घरात आईला पाहताच धावत आली अन् ढसाढसा रडू लागली निक्की; Video पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 04:04 PM2024-08-29T16:04:22+5:302024-08-29T16:04:44+5:30

निक्की पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरावर राज्य करताना दिसून येत आहे. सध्या निक्कीचा एक ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Nikki Tamboli Crying In Bigg Boss Hindi Throwback Video Goes Viral | Bigg Boss Marathi 5 | 'बिग बॉस'च्या घरात आईला पाहताच धावत आली अन् ढसाढसा रडू लागली निक्की; Video पाहून व्हाल अवाक्

'बिग बॉस'च्या घरात आईला पाहताच धावत आली अन् ढसाढसा रडू लागली निक्की; Video पाहून व्हाल अवाक्

Nikki Tamboli  :  'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे.  यंदाच्या सीझनमध्ये एकापेक्षा एक कल्लाकार स्पर्धक पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सध्या 'मराठी बिग बॉस'मुळे प्रचंड चर्चेत आहे.  निक्की पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरावर राज्य करताना दिसून येत आहे. सध्या निक्कीचा एक ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

'बिग बॉस हिंदी'मधून 'बिग बॉस मराठी'मध्ये आलेल्या निक्की हिची चर्चा सगळीकडे पाहायला मिळतेय. सध्या तिचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय, तो  'बिग बॉस हिंदी'मधला आहे.  व्हिडीओमध्ये घरातील सदस्यांसोबत कचाकचा भांडणारी निक्की ढसाढसा रडताना दिसून येत आहे. 'बिग बॉस हिंदी' 14 व्या सीझनमध्ये निक्की तांबोळी ही स्पर्धक होती. या सीझनमध्ये जेव्हा निक्कीच्या आईची तिला भेटण्यासाठी 'बिग बॉस'च्या घरात येते  तेव्हा आपल्या आईला पाहताच निक्कीला रडायला लागते. 


निक्कीने हिंदी 'बिग बॉस' गाजवलं होतं. यात ती टॉप 3 पर्यंत पोहोचली होती. पण तिला या शोचं विजेतेपद पटकावता आलं नव्हतं. मात्र, आता 'बिग बॉस मराठी'चा पाचव्या सीझनची ट्रॉफी उचलण्यासाठी निक्कीचे प्रयत्न आहेत. 'बिग बॉस'मराठीच्या घरात ती आपला गेम दाखवतेय. संपुर्ण महाराष्ट्राला तिनं वेड लावलं आहे.  सोशल मीडियावरही निक्कीच्या खास शैलीतील 'बाईSSS'  आणि 'हा काय प्रकार' हे डॉयलॉग चांगलेच गाजलेत.


Web Title: Nikki Tamboli Crying In Bigg Boss Hindi Throwback Video Goes Viral | Bigg Boss Marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.