निक्कीने पोस्ट केला अरबाजसोबतचा रोमँटिक सेल्फी, कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी; नेटकरी म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:21 IST2024-10-08T13:20:36+5:302024-10-08T13:21:06+5:30
निक्की-अरबाजची जोडी घराबाहेरही टिकून आहे.

निक्कीने पोस्ट केला अरबाजसोबतचा रोमँटिक सेल्फी, कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी; नेटकरी म्हणतात...
बिग बॉस मराठीचा पाचवा पर्व (Bigg Boss Marathi Season 5) नुकताच संपला. बिग बॉसचं घर म्हणलं की इथे जोड्या या बनतातच. हिंदी बिग बॉसमधील अनेक जोड्या बाहेर आल्यावरही तशाच राहिल्या. काहींनी लग्नही केलं. नुकत्याच झालेल्या मराठी बिग बॉसमध्ये गाजलेली जोडी म्हणजे निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel). आता बिग बॉस संपल्यानंतर निक्कीने अरबाजसोबत रोमँटिक सेल्फी शेअर केला आहे.
बिग बॉस मराठी ५ मध्ये अरबाज आणि निक्की या जोडीची खूप चर्चा झाली. दोघंही एकदम जिद्दीने टास्क खेळायचे आणि जिंकायचेही. त्यांच्यात भांडणं, रुसवे फुगवेही झाले. फिनाले दोन आठवडे बाकी असतानाच अरबाज घराबाहेर गेला. तेव्हा निक्की खूप रडली. नंतर निक्कीची आई घरात आली असताना तिने निक्कीला अरबाजबद्दल असं काही सांगितलं की गैरसमज वाढले. पण फिनालेच्या आदल्या दिवशी सर्व सदस्य घरात आले तेव्हा अरबाजही आला होता. अरबाज आणि निक्की पुन्हा एकत्र आले. तर आता बाहेर आल्यावर निक्कीने अरबाजसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. त्यावर तिने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.
निक्की आणि अरबाजच्या चाहत्यांची इन्स्टाग्रामवर पेजही आहेत. #arnik #nikbaz अशी नावं त्यांना मिळाली आहेत. 'बिग बॉस मराठी ५ या दोघांमुळेच गाजलं' अशा कमेंट्स चाहत्यांनी त्यांच्या फोटोंवर केल्या आहेत.
निक्की तांबोळी बिग बॉसमध्ये टॉप ३ पर्यंत पोहोचली होती. मात्र नंतर ती एलिमिनेट झाली. तिने हिंदी बिग बॉसही गाजवलं आहे. तर अरबाज पटेल 'स्प्लिट्सव्हिला' मधून आला होता.