निक्की तांबोळीने सांगितला बाईssss बोलण्यामागचा 'तो' किस्सा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 13:09 IST2024-10-15T12:49:48+5:302024-10-15T13:09:37+5:30
निक्कीने ती सारखं सारखं 'बाईssss' का म्हणते, याबद्दल सांगितलं.

निक्की तांबोळीने सांगितला बाईssss बोलण्यामागचा 'तो' किस्सा, म्हणाली...
Nikki Tamboli : यंदाचे 'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व हे आधीच्या चार पर्वांपेक्षा खूप जास्त गाजले. १०० दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांत शो संपला, पण तरीही घरातील सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान पक्क केलं आहे. यापैकी सर्वात जास्त चर्चेत राहणारी सदस्य म्हणजे निक्की तांबोळी. अगदी पहिल्या दिवसापासून निक्कीने अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलं. "बिग बॉस मराठी'मध्ये निक्कीची एक खास स्टाइलही चर्चेत आली. 'बाईssss' हा शब्द निक्की एका खास शैलीत म्हणते. बिग बॉस प्रेमींमध्ये तिचं वाक्य चांगलंच व्हायरल झालं आता निक्कीने ती सारखं सारखं 'बाईssss' का म्हणते, याबद्दल सांगितलं.
'बिग बॉस'च्या घराबाहेर आल्यावर निक्कीने विविध ठिकाणी मुलाखती दिल्या. यावेळी ती 'बिग बॉस'मधील गेम, अरबाज आणि इतर सदस्यांवर भरभरून बोलली. नुकतंच सकाळ प्रिमियरला दिलेल्या मुलाखतीमध्ये निक्कीने तिला बाईssss बोलण्याची सवय तिच्या एका पुण्यातील मैत्रिणीमुळे लागल्याचं सांगितलं. निक्की म्हणाली, "माझी पुण्याची एक मैत्रिण आहे स्नेहा ती सतत 'बाईssss' म्हणायची. तिची सवय मला लागली आणि मी बाईssss बाईssss बोलायला लागले. यामुळेच माझे सर्वच मित्र-मैत्रिण मला निक्की कमी आणि बाई बाई जास्त बोलू लागलेत. आता तर सर्वच मला काहीही बोलायचे असेल तरी बाई या नावानेच बोलतात".
'बिग बॉस'च्या घरात गप्पा मारताना निक्कीने आपल्या खास शैलीत 'बाईssss' हा शब्द उच्चारला होता. तिची शैली अनेकांना पसंत पडली. सोशल मीडियावरही निक्कीचे 'बाईssss' आणि 'हा काय प्रकार' हे डॉयलॉग चांगलेच गाजले. एवढंच काय तर तिचा 'बाईssss' हा शब्द डीजेत गाण्यात मिक्सिंग करण्यात आला. दरम्यान निक्की ही मुळची औरंगाबादमधील आहे. तिने औरंगाबादमध्येच पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर ती आता डोंबिवलीमध्ये राहतेय.