'ती खूप घाबरली असेल कारण...'; निक्कीने अंकिताला केलं टार्गेट, घरात नवीन वादाला तोंड फुटलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 12:01 IST2024-08-30T12:00:53+5:302024-08-30T12:01:21+5:30
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये निक्कीने अंकिताला सुनावलं असून दोघींमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झालीय (bigg boss marathi 5)

'ती खूप घाबरली असेल कारण...'; निक्कीने अंकिताला केलं टार्गेट, घरात नवीन वादाला तोंड फुटलं
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये दरदिवशी काहीतरी घडताना दिसते. या सीझनमध्ये निक्की तांबोळीची चांगलीच चर्चा आहे. निक्कीने आजवर घरात वर्षा उसगांवकर, आर्या जाधव, जान्हवी किल्लेकर, छोटा पुढारी अशा अनेकांशी पंगा घेत आलीय. त्यामुळे घरात कायम नवीन राडे पाहायला मिळाले. निक्कीने नुकतंच घरात कोकण हार्टेड गर्ल नावाने लोकप्रिय असलेल्या अंकिता वालावलकरसोबत भांडण केलेलं दिसतंय.
निक्कीने अंकिताला सुनावले खडेबोल
बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोत निक्की तांबोळी म्हणते की, "काल अंकिताची किती फाटली होती हे दिसतंय घरात सर्वांना. काल धनंजय सरांना सांगत होती की, मी नॉमिनेटेड आहे. आणि वर बोलते की, मला भीती नाय वाटत तुझ्या नॉमिनेशनची. इतकी फटिचर आहे ना. बिग बॉस काल यांचं वेगळं रुप बघितलं नॉमिनेट झाल्यावर." पुढे निक्कीने अंकिताची नक्कल करुन "एवढंच सांगते मी नॉमिनेटेड आहे." हे वाक्य म्हटलं. शेवटी निक्की म्हणाली, "कारण की मी आहे ना उभी म्हणून फाटलीय हिची. नॉमिनेशनमध्ये मी आणि अभिजीत आहे त्यामुळे घाबरलीय." असं निक्की मोठ्याने बोलत होती.
पुढे अंकिताने हे ऐकलं. ती बाहेर येऊन निक्कीला म्हणाली, "तू मला बोलतेय का? डायरेक्ट बोल ना तोंडावर." अशा शब्दात अंकिताने निक्कीला चांगलंच सुनावलं. आता या दोघींमधला वाद आणखी कोणत्या टोकाला जाणार हे आजच्या भागात कळेल. या आठवड्यात अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर हे चौघेजण नॉमिनेटेड आहेत. या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद असल्याने घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोणता ट्विस्ट असणार, हे पाहावं लागेल.