निक्की तांबोळी थिरकणार आयटम साँगवर, पंजाबी सिनेइंडस्ट्रीत करणार पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:09 IST2024-12-24T18:08:23+5:302024-12-24T18:09:20+5:30

Nikki Tamboli : निक्की लवकरच पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ती लवकरच बदनाम चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसणार आहे.

Nikki Tamboli will rock an item song, making her debut in the Punjabi film industry | निक्की तांबोळी थिरकणार आयटम साँगवर, पंजाबी सिनेइंडस्ट्रीत करणार पदार्पण

निक्की तांबोळी थिरकणार आयटम साँगवर, पंजाबी सिनेइंडस्ट्रीत करणार पदार्पण

निक्की तांबोळी(Nikki Tamboli)ला बिग बॉस मराठी ५ मधून चांगलीच लोकप्रियता मिळाली. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत असते. निक्की लवकरच पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ती लवकरच बदनाम चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे तिचे चाहते खूपच खूश आहेत.

निक्की तांबोळी याबद्दल म्हणाली, "'बदनाम'चा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हे एक गाणे आहे जे तुम्हाला थिरकायला भाग पाडेल आणि अशा अप्रतिम टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला आशा आहे की माझ्या चाहत्यांना हे गाणे नक्की आवडेल जेवढे मला या गाण्यात काम करताना मज्जा आली." सुनिधी चौहानने या गाण्याला स्वरसाज दिला आहे. बदनाम चित्रपट फेब्रुवारी २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. जय रंधावा, जास्मिन भसीन आणि मुकेश ऋषी अभिनीत हा एक रोमँटिक ड्रामा आहे. 

वर्कफ्रंट
निक्की तांबोळीच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली तर तिने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. २०१९ मध्ये, तिने तेलगू हॉरर कॉमेडी चित्रपट 'चिकाती गडिलो चिथाकोटुडु'मधून अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने 'कंचना ३' या ॲक्शन हॉरर चित्रपटातून दिव्याच्या रुपात तमीळमध्ये पदार्पण केले. तिचा तिसरा चित्रपट तेलुगुमधला थिप्पारा मीसम होता. २०२० मध्ये, तिने बिग बॉस १४ या हिंदी रिॲलिटी शोमध्ये भाग घेऊन टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले, जिथे ती तिसऱ्या स्थानावर होती.

Web Title: Nikki Tamboli will rock an item song, making her debut in the Punjabi film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.