'हसताय ना हसायलाच पाहिजे' घेणार प्रेक्षकांचा निरोप, ३ महिन्यातंच निलेश साबळेचा शो बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:07 PM2024-07-22T12:07:47+5:302024-07-22T12:10:00+5:30

निलेश साबळेच्या 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या नवीन शोला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण, हा शो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच अवघ्या तीनच महिन्यात निलेश साबळेच्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

nilesh sable onkar bhojane hastay na hasaylach pahije show will go off air in 3 months | 'हसताय ना हसायलाच पाहिजे' घेणार प्रेक्षकांचा निरोप, ३ महिन्यातंच निलेश साबळेचा शो बंद

'हसताय ना हसायलाच पाहिजे' घेणार प्रेक्षकांचा निरोप, ३ महिन्यातंच निलेश साबळेचा शो बंद

उत्तम अभिनेता, विनोदवीर आणि सूत्रसंचालक असलेल्या निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर कलर्स मराठीवर 'हसताय ना हसायलाच पाहिजे' हा शो सुरू केला होता. या शोमधून निलेश साबळे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. निलेश साबळेच्या या नव्या शोबाबत चाहतेही उत्सुक होते. 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या शोकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा होत्या. पण, आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

निलेश साबळेच्या 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या नवीन शोला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण, हा शो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच अवघ्या तीनच महिन्यात निलेश साबळेच्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. हा शो २४ एप्रिलला सुरू झाला होता. परंतु, आता अवघ्या काही महिन्यांतच या शोला गाशा गुंडाळावा लागला आहे.  निलेश साबळेबरोबर या शोमध्ये ओंकार भोजने आणि भाऊ कदमही होते. 

'हसताय ना हसायलाच पाहिजे' हा शो शनि-रवि रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होत होता. पण, आता 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होत असल्यामुळे हा शो बंद होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 'बिग बॉस मराठी ५' २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या शोचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.  'बिग बॉस मराठी ५'मध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 
 

Web Title: nilesh sable onkar bhojane hastay na hasaylach pahije show will go off air in 3 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.