निलू वाघेला ह्या अभिनेत्याला मानते स्वतःचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 08:30 PM2019-02-20T20:30:00+5:302019-02-20T20:30:00+5:30

'मै मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो' हा सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय मालिका आहे. सध्या या मालिकेत रुसलान मुमताज निभावत असलेल्या ध्रुव रायचंदच्या एंट्रीने एक रोचक वळण लागले आहे.

Nilu Vaghela considers the actor to be his own son in Mai Mayke Chali Jaungi Tum Dekhte Rahiyo | निलू वाघेला ह्या अभिनेत्याला मानते स्वतःचा मुलगा

निलू वाघेला ह्या अभिनेत्याला मानते स्वतःचा मुलगा

googlenewsNext

'मै मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो' हा सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय मालिका आहे. सध्या या मालिकेत रुसलान मुमताज निभावत असलेल्या ध्रुव रायचंदच्या एंट्रीने एक रोचक वळण लागले आहे. तो एक एनआरआय आहे आणि तो लगेच जयाच्या प्रेमात पडला आहे. निलू वाघेलाचे पात्र असलेल्या सत्या देवीला समर अजिबात आवडत नसल्याने ध्रुव तिचा आवडता झाला आहे.
 
निलू वाघेला ही सर्व कलाकारांची आवडती आणि उत्तम कलाकार आहे. कार्यक्रमात नुकत्याच एंट्री घेतलेला रुसलान मुमताज निलूच्या व्यक्तिमत्वावर फिदा झाला आहे आणि त्यांच्यात सुद्धा त्वरित चांगले संबंध तयार झाले. निलू आणि रुसलान ह्यांना फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही एकमेकांची कंपनी आवडते. अगदी कमी वेळात त्यांच्यात एक चांगला बॉण्ड तयार झाला आहे आणि ते दोन शॉट्सच्या मधल्या वेळेत सेटवर भटकत असतात. रुसलान एखाद्या लहान मुलासारखा खोड्या काढत असतो पण त्याचबरोबर तिच्याकडून अभिनयाचे धडेही घेत असतो.


निलू म्हणते, "मी सेटवर माझ्या मुलांना कधीही मिस करत नाही. आधी नमिश होता आता आणखी एक मुलगा आहे रुसलान जो मनाने अजूनही एखाद्या लहान मुलासारखा आहे आणि माझ्यावर आईसारखं प्रेम करतो. पडद्यावर मी त्याची सासू होईन की नाही माहित नाही पण मला खात्री आहे की त्याच्या मनात माझ्याबद्दल  स्वतःच्या आईइतकंच प्रेम आणि आदर आहे आणि माझंही तितकंच प्रेम आहे."
रुसलान बऱ्याच काळानंतर टेलिव्हिजनवर परत आला आहे आणि तेही सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर कारण इथेच त्यानी आपल्या पदार्पणाच्या मालिकेत म्हणजे 'कहता हैं दिल जी ले जरा' मध्ये काम केले होते.

Web Title: Nilu Vaghela considers the actor to be his own son in Mai Mayke Chali Jaungi Tum Dekhte Rahiyo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.