बाहेरचं लफडं, लग्नातील सोनंही विकलं अन् ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?; करण मेहराच्या पत्नीचा भलताच दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 08:55 AM2021-06-02T08:55:27+5:302021-06-02T08:58:16+5:30

इतकचं नाही तर मी घटस्फोट घेण्यासाठी तयार होते. हे नातं टिकवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले परंतु करणचं वागणं बदललं होतं असं निशाने सांगितले.

Nisha rawal made serious allegations against karan mehra openly speaking on extra marital affair | बाहेरचं लफडं, लग्नातील सोनंही विकलं अन् ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?; करण मेहराच्या पत्नीचा भलताच दावा

बाहेरचं लफडं, लग्नातील सोनंही विकलं अन् ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?; करण मेहराच्या पत्नीचा भलताच दावा

googlenewsNext
ठळक मुद्देकरणने माझ्या लग्नातील सोनंही विकून टाकलं. मुलाच्या जबाबदारीपासून करण पळ काढत होतामी करणशी बोलायला त्याच्या घरी गेले तेव्हा आमचं बोलणं सुरु असताना दोघांमध्ये वाद निर्माण झाला.नवऱ्याची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून मी कधी बाहेर सांगितले नाही.

मुंबई – ये रिश्ता क्या कहलाता है(Yesh Rishta kya Kehlata Hai) फेम करण मेहरा(Karan Mehra) आणि पत्नी निशा रावल(Nisha Rawal) यांच्यात सोमवारी रात्री मोठा वाद झाला आणि घरगुती भांडण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहचलं. याआधीही त्यांच्यात वादविवाद झाले होते. परंतु दोघांनी त्यावर बोलणं टाळलं होतं. परंतु आता निशा रावलने समोर येऊन करण मेहरावर गंभीर आरोप केले आहेत. यासाठी निशाने पत्रकार परिषदही घेतली.

निशा रावलने पत्रकार परिषदेत दावा केला की, करण मेहरा विवाहित असतानाही त्याचं बाहेर अफेअर सुरू होतं. अनेक दिवसांपासून करण माझा विश्वासघात करत होता. परंतु काही महिन्यांपूर्वी हे सत्य उघड झालं. मी करणच्या मोबाईलमधील मेसेज पाहिले. त्या दोघांना एकत्र बघितलं असल्याचंही सांगितले. नवऱ्याची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून मी कधी बाहेर सांगितले नाही. परंतु आता हा वाद घटस्फोटापर्यंत पोहचला आहे. करणने माझ्यासोबत नातं ठेवण्यास नकार दिल्याचं निशाने सांगितले.

इतकचं नाही तर मी घटस्फोट घेण्यासाठी तयार होते. हे नातं टिकवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले परंतु करणचं वागणं बदललं होतं. करणने माझ्या लग्नातील सोनंही विकून टाकलं. मुलाच्या जबाबदारीपासून करण पळ काढत होता. मात्र हे सहन होत नसल्याने मी करणशी बोलण्यासाठी गेले होते. तेव्हा करणने मला मारहाण केली. या मारहाणीचे काही फोटो निशाने पत्रकार परिषदेत दाखवले.

"बायको माझ्यावर थुंकली, नंतर स्वत:चं डोकं भिंतीवर आपटलं, अन्...”; अभिनेता करण मेहराचा खुलासा

त्या रात्री नेमकं काय घडलं?

निशाने सोमवारी रात्री काय घडलं तेही पत्रकार परिषदेत सांगितले. नात्याच्या भविष्यासाठी मी करणशी बोलायला त्याच्या घरी गेले तेव्हा आमचं बोलणं सुरु असताना दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावेळी करण मध्येच निघून गेला. मला वाटलं तो त्याच्या रुममध्ये गेलाय पण तो परत आला आणि माझं डोकं पकडून भिंतीवर आपटलं. डोक्यातून रक्त यायला लागलं तरीही करण थांबला नाही. त्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरात इतर लोकंही उपस्थित होते असं निशाने तक्रारीत म्हटलं आहे.

करणने निशावर काय आरोप केलेत?

निशा आणि तिच्या भावाने घटस्फोटासाठी जी रक्कम मागितली तेवढी रक्कम देणं शक्य नव्हतं. इतके पैसे मला देता येणार नाही त्यावरून आमच्यात वाद सुरू होता. रात्री १० वाजता ते दोघंही माझ्या जवळ आले. तेव्हाही ते याच विषयावर बोलत होते. मी स्पष्टपणे सांगितले इतकी रक्कम देऊ शकत नाही. तुम्हाला जे काही कायदेशीर करायचं आहे करा मीदेखील कायद्याने उत्तर देतो असं करण मेहराने सांगितले. यानंतर मी माझ्या रुममध्ये गेलो, माझ्या आईशी बोलत होता. तेव्हा निशा आतमध्ये आली तिने माझ्या आई-वडिलांना, भावाला शिवीगाळ करणं सुरू केले. जोरजोरात ओरडायला लागली आणि माझ्या अंगावर थुंकली. तेव्हा मी निशाला बाहेर जायला सांगितले त्यानंतर आता बघ मी काय करते अशी धमकी देऊन बाहेर गेली. सुरुवातीला निशाने स्वत:चं डोकं भिंतीवर आपटलं. सर्वांना हे सांगितलं करणने मारहाण केलीय. निशाच्या भावाने मला मारहाण केली. माझ्या गालावर आणि छातीवर मारहाणर केली. मी मारहाण केली नाही हवंतर घरातील कॅमेरे पाहू शकता पण कॅमेरे आधीच बंद केल्याचं आढळलं असं करणने सांगितले.

Read in English

Web Title: Nisha rawal made serious allegations against karan mehra openly speaking on extra marital affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस