म्हणून मला घरातले सगळे कॅमेरे बंद करावे लागले, करणच्या आरोपानंतर निशा रावलचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:50 PM2021-06-09T17:50:56+5:302021-06-09T17:55:23+5:30

निशा रावल आणि करण मेहरा या दोघांच्या ख-या नात्याचा चेहरा आज जगासमोर आला तेव्हा चाहत्यांनाही मोठा धक्काच बसला होता.निशाने पती करण विरोधात पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

Nisha Rawal Switched Off The Cameras Inside The House Because Of Karan Mehra,Know Why | म्हणून मला घरातले सगळे कॅमेरे बंद करावे लागले, करणच्या आरोपानंतर निशा रावलचा धक्कादायक खुलासा

म्हणून मला घरातले सगळे कॅमेरे बंद करावे लागले, करणच्या आरोपानंतर निशा रावलचा धक्कादायक खुलासा

googlenewsNext

टीव्ही इंडस्ट्रीतील करण मेहरा आणि निशा रावल सर्वात क्यूट कपल म्हणून ओळखले जायचे. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग, त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंगही पाहायला मिळायचे. करणही निशाची काळजी घेताना दिसायचा. सोशल मीडियावर तर या कपलचे एकत्र अनेक फोटो पाहायला मिळतील त्यावरुनच त्याच्यातलं नातं लग्नानंतर अधिक घट्ट झाल्याचे अनेकांना वाटायचे. मात्र जसे दिसते तसे नसते असेच काहीसे या कपलबद्दल म्हणता येईल.

सोशल मीडियावर भरभरुन प्रेम व्यक्त करणारे कपल त्यांच्या ख-या आयुष्यात मात्र एकमेकांसोबत अजिबात आनंदी नसल्याचे समोर आले. करणवर निशाने घरगुती हिंसाचाराबाबत आरोप केले.  निशा रावल आणि करण मेहरा या दोघांच्या ख-या नात्याचा चेहरा आज जगासमोर आला तेव्हा चाहत्यांनाही मोठा धक्काच बसला होता.निशाने पती करण विरोधात पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. निशाच्या तक्रारीनंतर करणला अटकही करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यावर करणने झालेल्या वादावर स्पष्टीकरण देत निशाने लावेल्या आरोपांवर मौन सोडले होते. 

दिवसेंदिवस दोघांमध्ये झालेल्या वादाची वेगवेगळी माहिती समोर येत आहे. करणच्या फोर बिएचके फ्लॅटमध्ये प्रत्येक रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. निशा रावलने करणवर मारहानीचा आरोप केला होता. यावर करणनेही घरात बसवलेले कॅमेरे जर सुरु राहिले असते तर सत्य समोर आले असते. निशाने स्वतःला भिंतीवर आपटून घेतले होते असे करणने सांगितले. इतकेच नाही तर घरात बसवण्यात आलेले सगळेच कॅमेरे निशाने स्वतःहून बंद केले होते. कॅमेरे बंद असल्यामुळे नेमकं कोण खोटं बोलतंय हे समोर आले नाही. 

यावर निशानेही करणने लावलेले सगळे आरोप मान्य करत म्हटले की, घरात कॅमेरे बसवण्यात आले होते. स्वतःहून काही दिवसांपूर्वी कॅमेरे बंद केल्याचेही तिने मान्य केले आहे. ज्या रुममध्ये कॅमेरे बसवण्यात आले होते. तिथे करण खुप चांगला वागायचा. मुलासोबत खेळण्यात रमायचा. कॅमे-यात त्याचे वागणे टिपले जाण्याची भीती त्याला होती. पण ज्या रुममध्ये कॅमेरे नव्हते त्या रुममध्ये तो मला मारायचा असा धक्कादायक खुलासा निशाने केला आहे. 

Web Title: Nisha Rawal Switched Off The Cameras Inside The House Because Of Karan Mehra,Know Why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.